Cockroach Found in Egg Bhurji Saam tv
मुंबई/पुणे

Goodluck Cafe: 'गुडलक' कॅफेचे पुन्हा 'बॅड लक'; आता अंडा भूर्जीमध्ये आढळलं झुरळ

Cockroach Found in Egg Bhurji: मुंबई-पुणे हायवेवरील फूड प्लाझामधील गुड लक कॅफेमध्ये एका व्यक्तीने अंडा भुर्जीची ऑर्डर दिली होती. त्यात झुरळ आढळून आली.

Bharat Jadhav

पुण्यातील गुडलक कॅफेमध्ये बन मस्कामध्ये काचेचा तुकडा सापडल्यानं कॅफे चर्चेत होतं. आता परत गुडलक कॅफे दुसरा प्रकार उघडकीस आलाय. अंडा भुर्जीमध्ये झुरळ आढळल्याची घटना समोर आलीय. परंतु हे गुडलक कॅफे पुण्यातील नसून मुंबई-पुणे हायवेवरील फूड प्लाझामधील आहे.

या गुडलक कॅफेमध्ये एका ग्राहकाने अंडा भुर्जीची ऑर्डर दिली होती. त्या भुर्जीमध्ये झुरळ आढळून आल्याचा आरोप केला जात आहे. दुसरी घटना घडल्यानंतर गुडलक कॅफेच्या स्वच्छतेचा विषय पुन्हा ऐरणीवर आलाय. एका व्यक्तीने अंडा भुर्जी घेतली. त्या भुर्जीमध्ये त्याला मेलेले झुरळ सापडल्याचा आरोप त्याने केला.

संबंधित व्यक्तीने भुर्जीचे फोटो शेअर केलेत. तसेच त्यासोबत अंडा भुर्जी घेतल्याचे बिलही शेअर केलंय. दरम्यान काही दिवसांपूर्वी पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक कॅफेमध्ये बन मस्कामध्ये काचेचा तुकडा सापडली होता. अन्न आणि औषध प्रशासनाकडून गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आलाय. त्यामुळे गुडलक कॅफे बंद ठेवण्यात आले आहे. फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर हे इराणी कॅफे आहे. या ठिकाणी बन मस्का, खिमा पाव अनेकांच्या आवडीचे पदार्थ आहेत. पण बन मस्कामध्ये काचेचा तुकडा आढळल्यानं हे कॅफे बंद करण्यात आले आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाकडून गुडलक कॅफेला काही त्रुटी सांगण्यात आल्यात. त्याची पूर्तता केल्यानंतर गुडलक कॅफे सुरु करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. अन्न आणि औषध विभागाने गुडलक कॅफेची तपासणी केली होती. त्यामध्ये त्यांना काही त्रुटी सापडल्या होत्या. त्याची पूर्तता करेपर्यंत गुडलक कॅफे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

कॅफेमध्ये कोणत्या त्रुटी आढळल्या?

काम करणाऱ्या कामगारांकडे मेडिकल सर्टिफिकेट नाही.

किचनमधील टाईल्स तुटलेल्या परिस्थितीत दिसल्या.

फ्रिजमध्ये घाण.

किचनमधील आणि बाहेरच्या बाजूला असलेल्या कचरपेट्या उघड्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT