Good News Mumbai Pune Expressway Two-hour block completed in 40 minutes Traffic has started Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Pune Expressway: दोन तासांचा ब्लॉक ४० मिनिटातच आटोपला; मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक सुरू

Mumbai-Pune Expressway Latest News: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ग्रँटी बसवण्याचे काम पूर्ण झाले असून दोन तासांचा ब्लॉक अवघ्या ४० मिनिटातच आटोपला आहे.

Satish Daud

दिलीप कांबळे, साम टीव्ही

Mumbai-Pune Expressway Latest News: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महामार्गावर ग्रँटी बसवण्याच्या कामासाठी आज दोन तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. प्रशासनाने विक्रमी वेळेत हे काम पूर्ण केले असून दोन तासांचा ब्लॉक अवघ्या ४० मिनिटातच संपवला आहे. (Latest Marathi News)

प्रशासनाच्या या विक्रमी कामामुळे मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्वरत झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Expressway)  सातत्याने अपघातांच्या घटना घडत होत्या. वाहनचालकांच्या बेजबाबदारपणामुळे अपघात होत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी होत्या.

हीच बाब लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवरील लोणावळ्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर शुक्रवारी ग्रँटी बसविण्याचे काम हाती घेतले. या ओव्हरहेड गॅन्ट्रीवर पुढच्या काळात सीसीटीव्ही (CCTV) बसविले जाणार आहे. हे कॅमेरे अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवतील.

त्याचबरोबर बेजबाबदारपणे वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसाठी मदत करतील दरम्यान, ब्लॉक कालावधीत पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर वळविण्यात आली होती. त्यानुसार, वाहनचालकांनी वळवण पथकर नाक्यावरून पुढे पुण्याच्या दिशेने मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरुन आपली वाहने वळवली.

महामार्गावरील वाहनांची कोंडी होऊन नये म्हणून प्रशासनाकडून दोन तासांचे हे काम प्रशासनाने अवघ्या ४० मिनिटाच्या विक्रमी वेळेत पूर्ण केले. प्रशासनाच्या या कामाचे कौतुक करावे तितके कमीच आहे. सध्या पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक नियमित सुरू झाली. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT