Good News MSRDC decision to extend one line each on both sides on Mumbai Pune Expressway Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Travel: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरून जाता येणार सुसाट; एमएसआरडीसीने घेतला मोठा निर्णय

Mumbai-Pune Expressway Traveling: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई ते पुणे प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai-Pune Expressway Traveling: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई ते पुणे प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी बघता, दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी एक लेन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तसा प्रस्ताव देखील तयार केला असून तो अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच एक्सप्रेस वेवर दोन्ही बाजून अतिरिक्त लेन बांधण्यास सुरूवात होईल.

या कामासाठी सुमारे ५ हजार कोटींचा खर्च होणार असल्याची माहिती ‘एमएसआरडीसी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून रोज सुमारे ६० ते ७० हजार वाहनांची वाहतूक होते. शनिवारी व रविवारी या संख्येत वाढ होऊन ती ९० हजारांच्या घरात जाते.

दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या, अपघातांचे वाढते प्रमाण व निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या मार्गावरच्या प्रवासाला अडथळा येतो. त्यामुळे वाहनचालकासह प्रवाशांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.

हीच बाब लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक्सप्रेस वेवर दोन्ही बाजूने प्रत्येकी एक लेन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन नवीन लेन तयार झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होईल, शिवाय प्रवासदेखील वेगवान होणार आहे. सद्यःस्थितीत या मार्गावर सहा लेन आहेत. यातील तीन लेन मुंबईच्या दिशेने, तर तीन पुण्याच्या दिशेने आहेत.

तब्बल २१ वर्षांनंतर नव्या लेनचा विचार

महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईला पुण्यासोबत जोडण्यासाठी २००२ मध्ये ९४ किलोमीटरचा द्रुतगती मार्ग तयार करण्यात आला. ज्या वेळी हा मार्ग बांधण्यात आला, त्यावेळी वाहनांची संख्या कमी होती. आता मात्र त्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दोन नवीन लेन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल २१ वर्षांनंतर हा विचार झाला आहे.

दरम्यान, द्रुतगती मार्गावर लेन वाढविताना अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे. ‘एमएसआरडीसी’च्या ताब्यात काही जागा आहेत, तर आणखी काही गावांतील जागांचे संपादन करावे लागणार आहे. शिवाय या मार्गावर १० नवीन बोगदेदेखील बांधावे लागणार आहेत. सध्याच्या बोगद्यांचा विस्तार केला जाणार नाही.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाऊबीजेच्या दिवशी सोन्याला ओवाळणी, चांदी रूसली, सुवर्णनगरीत १ तोळ्याला किती भाव? जाणून घ्या

Rohit Sharma Record : रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियात रचला इतिहास; विराट, सचिन तेंडुलकरही मागे पडले

Kalyan: दोन गटात तुफान राडा, दगडफेक- तोडफोड अन् हाणामारी; एकमेकांची डोकी फोडली; VIDEO व्हायरल

Festive Car Sales: सणासुदीच्या काळात 'या' ब्रँडच्या गाड्यांचा विक्रमी रेकॉर्ड; ४ लाखांहून अधिक गाड्या विकल्या, वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: कार्यकर्त्यांवर होणाऱ्या संभाव्य खोट्या गुन्ह्यांना उत्तर देण्यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या नेत्याची 'अनोखी शक्कल'

SCROLL FOR NEXT