PMPML google
मुंबई/पुणे

PMPML: पुणेकरांसाठी खुशखबर! पीएमपीएमएलच्या ताफ्यात लवकरच १००० नव्या बसचा होणार समावेश

PMPML Bus: पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पीएमपीएमएलच्या ताफ्यात लवकरच १,००० नवीन बस दाखल होणार आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार असून वाहतूक व्यवस्था सुसाट होण्याची अपेक्षा आहे.

Dhanshri Shintre

पुणे व पिंपरी चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी पीएमपीएमएलच्या ताफ्यात लवकरच एक हजार नवीन बस समाविष्ट केल्या जाणार आहेत. बुधवारी पीएमआरडीएने ५०० बस खरेदीचा निर्णय घेतला असून पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकादेखील ५०० बस उपलब्ध करून देणार आहेत.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात बसांची संख्या कमी असल्याने सार्वजनिक वाहतुकीवर ताण वाढला आहे, तर खासगी वाहनांच्या वाढत्या वापरामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिकच गंभीर होत आहे. या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने पुणे व पिंपरी चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भात पालकमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही पीएमपीएलसाठी नवीन बस खरेदीचे संकेत दिले होते. या उपाययोजनांमुळे सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळेल आणि वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी सीएनजीवरील १००० बस खरेदीला मान्यता देण्यात आली. या बैठकीला पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आणि अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. उपस्थित होते. निर्णयानुसार, पीएमआरडीए ५०० बस पीएमपीएलला उपलब्ध करून देणार आहे. या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.

पीएमआरडीएच्या अंदाजपत्रकात बस खरेदीसाठी तरतूद करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांना ५०० बस उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. सध्या या शहरांमध्ये ६००० बसांची गरज असून रस्त्यावर फक्त १६५० बस चालतात. आयुर्मान संपल्याने ३०० बस कमी होणार असल्याने बस खरेदीची मान्यता पीएमपीएमएमलसाठी महत्त्वाची ठरणार आहे. खरेदीसाठी ४०-४५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियांची धमकी| VIDEO

SCROLL FOR NEXT