CNG-PNG Price Saam Tv
मुंबई/पुणे

CNG-PNG Price Cut: पुणेकरांसाठी खुशखबर! सीएनजी-पीएनजीच्या दरात मोठी कपात, कितीने झाले कमी घ्या जाणून!

Latest News : सीएनजी-पीएनजीच्या दरात (CNG-PNG Price) कपात झाल्याचा फायदा हा देशभरातील सात राज्यातील जनतेला होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

CNG-PNG Price News : टोरेंट गॅस प्रायव्हेट लिमिटेडने (Torrent Gas Private Limited) ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. या कपंनीने सीएनजीचे दर 6 रुपयांवरून 8.25 रुपये प्रति किलोपर्यंत कमी केले आहेत. कंपनीने पीएनजीच्या दरात देखील कपात केली आहे. पीएनजीचे दर 4 रुपयांवरून 5 रुपये प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटरपर्यंत कमी केले आहे. सीएनजी-पीएनजीच्या दरात (CNG-PNG Price) कपात झाल्याचा फायदा हा देशभरातील सात राज्यातील जनतेला होणार आहे. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातल्या पुणेकरांना याचा मोठा फायदा होणार आहे.

टोरेंट गॅस प्रायव्हेट लिमिटेडने सीएनजी-पीएनजीच्या दरात कपात करत जे नवे दर जाहीर केले आहेत ते 8 एप्रिल 2023 म्हणजेच शनिवारी रात्रीपासून लागू झाले आहेत. टोरेंट कंपनीने पंजाब आणि पुण्यात सीएनजीचे दर प्रति किलो 6 रुपयांनी कमी केले आहेततर पीएनजीचे दर 5 रुपयांनी कमी केले आहे. पुण्यात सीएनजीची आजचे दर 87 रुपये प्रति किलो आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे वाढत्या महागाईत नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीएनजीच्या दरात कपात झाल्यामुळे रिक्षा, कार चालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दुसरीकडे, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये सीएनजीचे दर 6 रुपयांवरून 8.25 रुपये प्रति किलोपर्यंत कमी करण्यात आले आहेत. तर देशांतर्गत पीएनजीचे दर प्रति एससीएम (SCM) 4 ते 5 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. टोरेंटने जुनागडमधील 17 स्थानकांवर सीएनजीच्या दरात 6 रुपयांनी आणि पीएनजीच्या दरात 4 रुपयांची कपात केली आहे.

टोरेंट गॅस प्रायव्हेट लिमिटेड देशातील 7 राज्यातील एकूण 34 जिल्ह्यांमध्ये गॅस पुरवठा करते. या सात राज्यांमध्ये गुजरात, तेलंगणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र आणि पुदुचेरी या सात राज्यांचा समावेश आहे. या सर्व राज्यांमध्ये सीएनजी-पीएमजीच्या दरात कपात झाल्यानंतरचे नवे दर जाहीर झाले आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारने नॅचुरल गॅसच्या (Natural Gas) किंमती निश्चित करण्यासाठी नवा फॉर्म्युला तयार केला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर अनेक कंपन्यांनी पीएनजी आणि सीएनजीच्या दरात कपात केली होती. टोरेंट गॅस प्रायव्हेट लिमिटेडपूर्वी महानगर गॅस लिमिटेड, अदानी टोटल गॅस आणि इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) यांनी पीएनजी-सीएनजीच्या दरात कपात केली आहे.

सीएनजीचे नवीन दर -

उत्तर प्रदेश - 89.50 रुपये प्रति किलो

गुजरात - 77.17 रुपये प्रति किलो

तेलंगणा - 89.50 रुपये प्रति किलो

राजस्थान - 89 रुपये प्रति किलो

पंजाब - 87 रुपये प्रति किलो

महाराष्ट्र - 87 रुपये प्रति किलो

पुदुचेरी - 71 रुपये प्रति किलो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप; ठाकरेंच्या आमदाराच्या निवडणूक प्रचारात CM फडणवीसांचा फोटो|VIDEO

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT