Mumbai Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी GOOD NEWS! सोमवारपासून मेट्रोच्या 8 नव्या फेऱ्या;वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार

मेट्रो सेवांची एकूण संख्या आता २४५ वरून २५३ होणार

Shivani Tichkule

संजय गडदे

Mumbai Metro News: मुंबई महा मेट्रोने मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत मेट्रोच्या आणखी आठ फेऱ्या दाखल होणार आहेत. मेट्रो-2 a आणि मेट्रो-7 मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबईकरांकडून या सेवेला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. (Latest Marathi News)

या दोन्ही मार्गांना मिळणारा प्रतिसाद आणि प्रवाशांकडून अधिकच्या फेऱ्यांची होणारी मागणी लक्षात घेता सोमवारपासून या मार्गावर या अधिकच्या आठ फेऱ्या सुरू केल्या जाणार आहेत. यामुळे आता या मार्गांवर मेट्रो फेऱ्यांची संख्या 245 वरून 253 वर पोहोचणार आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते मुंबईकरांसाठी (Mumbai) फायदेशीर ठरणाऱ्या मेट्रो दोन आणि मेट्रो सात मार्गीकीचे लोकार्पण करण्यात आले. पहिल्या दिवसापासूनच या दोन्ही मेट्रो (Metro) मार्गाला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. सध्या प्रत्येक दिवशी या मार्गावरून एक लाख 84 हजार इतके प्रवासी प्रवास करत आहेत.

पिकावर्समध्ये फेऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी प्रवाशांकडून झाल्यानंतर एम एम आर डी ए मेट्रो प्रशासनाने प्रवाशांच्या मागणीचा विचार करून आठ फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे गुंदवली ते अंधेरी पश्चिम या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे शिवाय त्यांच्या वेळेची देखील बचत होणार आहे. (Mumbai News)

पीक अवर्समध्ये या सेवांची भर पडल्याने, मेट्रो सेवांची एकूण संख्या २४५ वरून २५३ पर्यंत इतकी होणार आहे. सध्या दोन मेट्रो फेऱ्यांमधील प्रतीक्षा वेळ हा 7.50 मिनिट इतका असून अधिक आठ फेऱ्या वाढल्यानंतर प्रतीक्षा वेळ 7.28 सेकंद इतका होणार आहे यामुळे पिक अवर काळात गर्दीवर नियंत्रण मिळवण्यास सोबतच प्रवाशांचा वेळ देखील वाचणार आहे.

नॉन-पीक अवर्स दरम्यान, मेट्रो सेवांची प्रतीक्षा वेळ 10:25 इतकी असणार आहे. त्याचप्रमाणे, रविवार आणि मोठ्या सरकारी सुट्टीच्या दिवशी 205 फेऱ्या होतील ज्याद्वारे मेट्रो सेवांची वारंवारता दर 10:30 मिनिटांनी सुरू राहील.

मेट्रो मार्ग 2a आणि 7 साठी प्राप्त झालेल्या 30 मेट्रो रेकपैकी 27 प्रवासी मेट्रो सेवांसाठी आधीच कार्यान्वित करण्यात आले आहेत. या अतिरिक्त सेवांमुळे प्रवाशांची कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि प्रतीक्षा वेळ कमी होईल आणि त्यामुळे मुंबई मेट्रो (Mumbai Metro) नेटवर्कवर प्रवास करताना प्रवाशांची गैरसोय होणार नाही असे एम एम आर डी ए चे सीएमडी एस व्ही आर श्रीनिवास म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT