Weather Forecast Today: मुंबईकरांनो काळजी घ्या! मुंबईत पुढील २४ तास उष्णता कायम राहणार

Mumbai Weather Forecast Today : पुढील २४ तास मुंबई आणि ठाणेसह कोकणात वातावरण दमट हवामान आणि तीव्र उष्णता राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Maharashtra Weather Forecast Today
Maharashtra Weather Forecast Todaysaam tv

Maharashtra Weather Forecast Today : मुंबईकरांना आजही उष्णतेच्या झळा सोसाव्या लागणार आहे. कारण मुंबईमध्ये पुढील २४ तास उष्णता कायम राहणार असल्याचा अंदाज हवामाना विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मागील ३ दिवसांपासून मुंबईकर गरमीने हैराण आहे.

दमट वातावरण आणि उन्हाचा कडाका यामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत. परंतु पुढील २४ तास तरी या उष्णतेमुळे मुंबईकरांची सुटका होणार नाही. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Maharashtra Weather Forecast Today
Dombivli Accident: घरी परतत असताना काळाचा घाला, भरधाव डंपरने पादचाऱ्याला चिरडलं

मुंबईत शुक्रवारी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच पुढील २४ तास मुंबई आणि ठाणेसह कोकणात वातावरण दमट हवामान आणि तीव्र उष्णता राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावे असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. (Mumbai Weather)

Maharashtra Weather Forecast Today
Horoscope Today : एखादी भाग्यकारक घटना घडेल! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

नंदूरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला

नंदूरबार जिल्ह्यात उष्णतेचा पारा पुन्हा वाढला असून तापमान ४०°c पेक्षा अधिक गेले आहे. दिवसाचे सरासरी तापमान अचानक वाढल्याने मानवी जीवनावर परिणाम होत आहे. जिल्ह्यात दुपारच्या वेळी चटके देणारे ऊन आणि असा उकाडा होता रस्ते निर्मनुष्य दिसू लागले आहे. उन्हाच्या तडाका वाढल्याने बर्फ पासून तयार होणाऱ्या पदार्थांची मागणी वाढली असून नागरिक थंड प्यायला पसंती देत आहे. (Latest Marathi News)

जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील नवीन केळी, पपई, टरबूज आणि फळभाज्यांवर या उन्हाच्या चांगलाच परिणाम होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून पिका आणि फळबागा वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात तापमान ४० ते ४२ अंश अंशाच्या जवळ गेले आहे. जिल्ह्यात आणखीन काही दिवस असाच तापमान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com