Best Bus Saam TV
मुंबई/पुणे

New EV Buses In Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर! नवीन वर्षात प्रवाशांच्या सेवेत येणार ५० ईलेक्ट्रिक एसी डबलडेकर बसेस

सीसीटीव्ही कॅमेरे, पुश बॅक सिट्स, सिट्स समोर लॅपटॉप ठेवण्यासाठी जागा, वातानुकूलित अशी लक्झरी बसची वैशिष्ट्ये आहेत.

सुरज सावंत

Mumbai Today News: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबईकरांना प्रतिक्षा असलेल्या ईलेक्ट्रिक एसी डबलडेकरला नवीन वर्षात मकरसंक्रांतीला मुहूर्त मिळाला आहे. पहिल्या टप्यात ५० ईलेक्ट्रिक एसी डबलडेकर मुंबईकरांच्या सेवेत चालविण्यात येणार आहेत. तर डिसेंबर २०२३ पर्यत ९०० ईलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत, त्यामुळे बसने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मोठा लाभ मिळणार आहे. (Mumbai Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, बस खरेदीसाठी ७०० कोटी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासह अन्य कामांसाठी दोन हजार कोटी असे २,७७४ कोटी रुपये अनुदान देण्याची मागणी बेस्टने पालिकेकडे केली आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सध्या ४५ डबलडेकर बस असून त्यांचे आयुमर्यादा संपत आल्याने जून २०२३ पर्यंत भंगारात काढण्यात येणार आहे. नवीन येणाऱ्या डबलडेकर इलेक्ट्रिक (EV) वातानुकूलित असणार आहेत. (Latest Marathi News)

प्रवासी क्षमता वाढविण्यासोबतच डिझेलवरील खर्च कमी करण्यासाठी बेस्टने ९०० ईलेक्ट्रिक एसी डबलडेकर आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी पहिल्या ५० बस जानेवारी महिन्यापासून मुंबईच्या रस्त्यावर धावणार आहेत. विशेष म्हणजे घरातून मोबाईल अँपवर तिकिट बुकिंग केल्यावर संबंधित प्रवाशांची सिट्स आरक्षित राहणार आहे. एकूण दोन हजार लक्झरी बस दाखल होणार असून त्यापैकी २० बस दाखल झाल्या आहेत. (LIVE Marathi News)

तसेच बेस्ट उपक्रमाने जून २०२२ पासून मुंबईतील निवडक थांब्यांवर ईलेक्ट्रिक दुचाकी सेवा सुरू केली. सध्या ७०० दुचाकी सेवेत आहेत. लवकरच जून महिन्यापर्यत आणखी पाच हजार दुचाकींची त्यात भर पडणार आहे. अंधेरीतील ४० ठिकाणी प्रयोगिक तत्वावर दुचाकी सेवा सुरू केली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुचाकी सेवांचा विस्तार केला जाणार आहे. बेस्ट उपक्रमातर्फे मुंबईकरांना ओला-उबेरप्रमाणे ई-टॅक्सीची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. नवीन वर्षात जून महिन्यापर्यत ५०० ई-टॅक्सी मुंबईकरांच्या सेवेत सुरु करण्याचा बेस्टचा विचार आहे. मुंबईकरांना या ई-टॅक्सीचे भाडेदर परवडणारे असेल.

नागरिकांकडून ईलेक्ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ईलेक्ट्रिक वाहनांना चार्जिगची सोय पुरविण्यासाठी बेस्टने ३३० चार्जिग स्टेशन उभारण्याचे काम सुरु केले आहे. नागरिकांना आपली खासगी ईलेक्ट्रिक वाहने येथे चार्ज करता येणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे, पुश बॅक सिट्स, सिट्स समोर लॅपटॉप ठेवण्यासाठी जागा, वातानुकूलित अशी लक्झरी बसची वैशिष्ट्ये आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिका निवडणुकांची तयारी सुरू, राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश, बिगूल कधी वाजणार? VIDEO

Waterfalls near Neral: गर्दी कमी आणि लांब जाण्याचीही गरज नाही! नेरळ-माथेरान जवळ आहेत 'हे' लपलेले धबधबे

Pune Shivneri Bus : दारु पिऊन शिवनेरी चालवत होता, प्रवाशांनी दारुड्या चालकाला रंगेहाथ पकडले अन् पुढे...

Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; धाराशिवातील बड्या नेत्याकडून पदाचा राजीनामा

Gaganbawda Tourism: कोल्हापूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण, या विकेंडला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT