Monsoon Enter In Maharashtra Rain Updates
Monsoon Enter In Maharashtra Rain Updates Saam TV
मुंबई/पुणे

Monsoon Updates: छत्र्या बाहेर काढा! अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल; पुढील ३-४ तासांत या जिल्ह्यांमध्ये बरसणार

Satish Daud-Patil

Monsoon Enter In Maharashtra: उकाड्याने हैराण होऊन बसलेल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केरळनंतर आता मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. आज ११ जून रोजी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर येत्या ३-४ तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाच्या सरी कोसळणार, असा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिला आहे.  (Latest Marathi News)

राज्यातील शेतकरी (Farmers) मान्सूनची आतुरतेने वाट पाहत होते. मान्सूनच्या आगमनाची वार्ता ऐकताच सगळ्यांनाच दिलासा मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे ८ जून रोजी मान्सून केरळमध्ये धडकला होता. केरळात उशिराने मान्सून धडकल्याने महाराष्ट्रातही मान्सून लांबणार असल्याची चर्चा होती.

अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल

मात्र, या सगळ्या शक्यतांवर मात करत मान्सून (Monsoon Updates) आज ११ जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या मान्सून महाराष्ट्रातील रत्नागिरीपर्यंत पोहोचला आहे. तर कर्नाटकातील शिमोगा, हसन या शहरांसह धर्मपुरी, श्रीहरी कोटा इथपर्यंत मान्सून पोहोचला आहे.

मान्सून दाखल होण्याचा दरवर्षीचा अंदाज पाहता यंदा मान्सून चार ते पाच दिवस उशिरानं दाखल झाला आहे. दरम्यान मान्सून महाराष्ट्रात दाखल होताच, हवामान विभागाने येत्या तीन ते चार तासात वादळी वाऱ्यासह पावसाची (Rain Alert)  शक्यता वर्तवली आहे.

येत्या ३-४ तासांत या जिल्ह्यांमध्ये पाऊस

महाराष्ट्रात येत्या ३-४ तासात रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, IMD ने याबाबत माहिती दिली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : राज्यात पाचव्या टप्प्यात सर्वात कमी ४८.६६ टक्के मतदान तर या राज्यात झालं उच्चांकी मतदान; 7 वाजल्यानंतरही मतदान सुरू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा पुन्हा सरकारला अल्टिमेटम; आरक्षण दिलं नाही तर या तारखेला उग्र आंदोलनाचा इशारा

Pune Porsche Car Accident Case: आरोपीला वाचवण्यासाठी स्थानिक आमदाराचा पोलिसांवर दबाव; RTI अधिकाऱ्याचा आरोप

Maharashtra Lok Sabha Voting Live: निकालाआधीच सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामाच्या कार्यकर्त्यांनी कल्याणमध्ये फोडले फटाके

Lok Sabha Election Voting | बॉलिवूडच्या सुपरस्टार्सनी बजावला मतादानाचा हक्क!

SCROLL FOR NEXT