Pune Mahapalika Recruitment Saam TV
मुंबई/पुणे

Pune Mahapalika Recruitment : खुशखबर! पुणे महापालिकेत होणार मोठी नोकरभरती; 'या' पदांसाठी करता येईल अर्ज

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे महापालिकेडून मोठी नोकरीभरती करण्यात येणार आहे.

Prachee kulkarni

Pune Mahapalika Recruitment : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे महापालिकेडून मोठी नोकरीभरती करण्यात येणार आहे. पालिकेने पहिल्या टप्प्यात ४४८ पदांची भरती पूर्ण केल्यानंतर आता याचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण ११ प्रकारच्या पदांसाठी ३४० जागांची भरतीची प्रक्रिया पार पडणार आहे. (Latest Marathi News)

पुणे महापालिकेत कोणती पदे रिक्त?

पुणे महापालिकेने (Pune Mahapalika) पहिल्या टप्प्यात ४४८ पदांची भरती पूर्ण केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ११ पदांसाठी ३४० जागांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये अग्निशामक दलासाठी २०० पदे, निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची २० पदे, आरोग्य निरीक्षक ४० यासह इतर विभागातील रिक्त पदांचा समावेश आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवला आहे.

राज्य शासनाने (Government Job) भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठविल्यानंतर महापालिकेने मागीलवर्षी कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण निरीक्षक, लिपिक पदाच्या तब्बल ४४८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. आयबीपीएस संस्थेकडून ऑनलाईन परीक्षा पारदर्शकपणे पार पाडली.

भरती प्रक्रिया कशी पार पडणार?

त्यानंतर कागदपत्रांची छाननी करून पात्र उमेदवारांना महापालिकेच्या सेवेत घेतले आहे. ही पद्धतीने ही भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर आता आणखी ११ पदांची भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यामध्ये अग्निशामक दल आणि आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी रोस्टर तपासणी करून तब्बल ३४० पदांच्या भरतीसाठीचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी महापालिका आयुक्तांकडे दिला होता. आयुक्तांनी त्यास मान्यता दिल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला आहे. या प्रस्तावानुसार आयबीपीएस या कंपनीकडेच भरतीची जबाबदारी दिली जाणार आहे.

भरती गेल्या जाणाऱ्या पदांची संख्या

अग्निशामक दल, फायरमन (२००), क्ष किरण तज्ञ (८), वैद्यकीय अधिकारी (२०), उप संचालक, प्राणी संग्रहालय (१), पशू वैद्यकीय अधिकारी (२), वरिष्ठ आरोग्य निरीक्षक (२०), कनिष्ठ अभियंता, विद्युत (१०), आरोग्य निरीक्षक (४०), वाहन निरीक्षक (३), औषध निर्माता (१५), पशुधन पर्यवेक्षक (१)

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhimashankar Temple : भाविकांसाठी मोठी बातमी! 'या' तारखेपासून भीमाशंकर मंदिर राहणार ३ महिन्यांसाठी बंद, पण...

Vastu Tips : तुमच्या जवळील 'या' पाच गोष्टी कधीच कोणाला देऊ नका, नाहीतर येतील अडचणी

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे महामार्गावर सुट्ट्यांमध्ये वाहतूक कोंडी..

Gmail Update: आता Gmail ID बदलता येणार! Google आणतोय भन्नाट फीचर, मेलचं झंझट होईल कमी

PNB Fraud: बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! पंजाब नॅशनल बँकेत २४३४ कोटींचा घोटाळा

SCROLL FOR NEXT