driverless taxi India google
मुंबई/पुणे

Pod Taxi Update: 40 kmph स्पीड, 6 सीटर, चालवायला ड्रायव्हरही नसणार; मुंबईत धावणार भारतातली पहिली पॉड टॅक्सी

Mumbai Pod Taxi Project : मुंबईत कुर्ला ते बीकेसी दरम्यान ड्रायव्हरशिवाय पॉड टॅक्सी प्रकल्प सुरू होत असून 40 किमी वेग, 6 सीट क्षमता आणि 22 स्टेशनमुळे प्रवास जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

मुंबई ही कधीच झोपत नाही असं म्हणतात. कारण इथे २४ तास लोकांची वर्दळ पाहायला मिळत असते. इथे दिवसरात्र लोक बाहेर असतात. मग कामानिमित्त असो किंवा आणखी कोणत्याही गोष्टीसाठी. त्यामुळे इथे प्रवासाठी सोयीस्कर वाहनांची गरज असते. याचाच विचार करुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री द्रेवेंद्र फडणवीस यांनी नवीन पॉड टॅक्सी प्रकल्प मुंबईत आणला. याचे मंगळवारी भूमी पूजनसुद्धा करण्यात आलं. याने मुंबईकरांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. कारण या पॉड टॅक्सीचा वापर सोपा आणि सोयीस्कर असणार आहे.

तुम्हाला सगळ्यात वर्दळीच्या भागात आणि मध्यभागी असलेल्या कुर्ला आणि बीकेसी बांद्रा कुर्ला कॉम्लेक्समध्ये या टॅक्सीने प्रवास करता येणार आहे. याने बीकेसी वाहतूक कोंडी नक्कीच कमी होईल अशी प्रवाशांची आशा आहे. महत्वाचं म्हणजे याने तिथे जाणाऱ्या नोकरदार वर्गाचा प्रवास सुरळीत आणि कमी वेळत होईल.

मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA) ने हा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. याचा प्रवास तुम्हाला कुर्ला आणि बांद्रा कॉम्प्लेक्सच्यामध्ये करता येणार आहे. कारण बीकेसी हे एक महत्वाचं कर्मशिअल हब झालं आहे. तिथे अनेक मल्टीनॅशनल कंपन्या, बॅंका, इंडियन न्यूज पेपर सोसायटी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, कॅफेस, मोठे हॉटेल्स, भारत डायमंड बॉर्स आहेत. त्यामुळे या ठिकाणी अनेकजण मोठ्या संख्येने नोकरीसाठी रोज प्रवास करत असतात.

पॉड टॅक्सीसाठी २२ एअर-कंडीशनर स्टेशन उभारण्यात येतील. हा एकूण ८.८५ किलोमीटरचा प्रकल्प आहे. जो टप्प्याटप्प्याने विकसित केला जाणार आहे. याची लांबी साधारण २०० मीटर इतकी असेल.

सुरुवातीला यामध्ये बांद्रा ईस्टपासून ते कुर्ला यामध्ये ३.३६ किलोमीटरचे अंतर कव्हर केले जाणार आहे. तसेच यामध्ये ६ लोकांना बसण्याची जागा मिळेल. या टॅक्सीचा स्पीड हा 40Kmph प्रति तास असणार आहे. ही टॅक्सी १५ सेंकदांने ग्राहकांनी सांगितलेल्या ठिकाणी थांबेल. याने प्रवास अधिकच सोपा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT