Mumbai Gold Seized Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Gold Seized: मुंबईत तब्बल १० किलो सोने जप्त, किंमत जाणून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईत तब्बल १० किलो सोने जप्त, किंमत जाणून व्हाल थक्क

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Gold Seized: मुंबईत महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मोठी कारवाई केली आहे. डीआरआयने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 6 कोटींहून अधिक किमतीचे सोने जप्त केले आहे. डीआरआयने वेगवेगळ्या प्रकरणात एकूण 10 किलो सोने जप्त केले आहे.

पहिल्या गुन्ह्यात शारजा वरून आलेल्या दोघा प्रवाशांकडून आठ सोन्याच्या विटा जप्त कारणात आल्या आहेत. या दोघांनी 24 कॅरेट सोन्याच्या विटा कंबरेला बांधून लपवल्या होत्या. आठ विटांची किंमत 4.94 कोटी रुपये आहे.

दुसऱ्या प्रकरणात दुबईहून येणाऱ्या भारतीय वंशाच्या प्रवाशाकडून एकूण 56 महिलांच्या पर्स जप्त (clutches) करण्यात आल्या आहेत. पर्सच्यावरील बाजूस पत्र्याच्या आत शिताफीने लपवण्यात आल्या होत्या सोन्याच्या तारा. (Latest Marathi News)

या 56 पर्समध्ये जी पट्टी जप्त करण्यात आली आहे. त्यात 2 किलो 5 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. याची किंमत 1 कोटी 23 लाख 80 हजार 875 रुपये आहे.

हैदराबादमध्ये 42 लाख रुपयांचे सोने जप्त

दरम्यान, मागच्या महिन्यात हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवरुन (Rajiv Gandhi International Airport) सोन्याची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला कस्टमच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. परदेशातून भारतामध्ये हे सोनं आणण्यात आले होते. या सोन्याची किंमत तब्बल 42 लाख रुपये आहे. महत्वाचे म्हणजे या व्यक्तीने हे सोनं गुदद्वारात लपवून आणले होते. पण त्याचा सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न फसला.

कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्तकवरुन हैदराबादमध्ये हा प्रवासी येत होता. पण हैदराबाद विमानतळावर उतरल्यानंतर तपासणी दरम्यान कस्टम अधिकाऱ्यांनी त्याच्याविरोधात ही कारवाई केली. या प्रवाशाकडे सोन्याची पेस्ट सापडली. त्याने ही सोन्याची पेस्ट गुदद्वारामध्ये लपवली होती. अटक करण्यात आलेला हा प्रवासी मध्य प्रदेशमध्ये राहणारा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sesame Seeds: पांढरे तीळ खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे महितीये का?

Maharashtra Live Update: कोल्हापूरच्या कुरुंदवाडमध्ये बँक घोटाळ्याविरोधात मेथे दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

Maharashtra Politics : ठाकरे-शिंदे कार्यकर्ते आमनेसामने, पालकमंत्र्याच्या बैठकीत राडा; नेमकं काय झालं? VIDEO

Mumbai News : मुंबईत प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीची आत्महत्या, धक्कादायक कारणही समोर

Helicopter crash : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं, २ पायलटसह ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT