eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde: राज्यातल्या जनतेसाठीच गुवाहाटीला जातोय; आमचा दुसरा कोणताही अजेंडा नाही

हे आम्ही राज्यातल्या जनतेसाठीच करतोय. बळीराजाला सुखी करावं, यासाठी कामाख्या देवीच्या दर्शनाला आम्ही जातोय त्यात आमचा वेगळा असा अजेंडा काही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Ekath Shinde Group Guwahati Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह आज, शनिवारी गुवाहाटी दौऱ्यासाठी निघाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातल्या जनतेसाठीच आम्ही गुवाहाटीला जातोय, बाकी आमचा दुसरा कोणताही अजेंडा नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. सकाळी १० वाजता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गुवाहाटीला रवाना होणार आहेत. गुवाहाटीत जाऊन ते कामाख्या देवीचे दर्शन घेतील. तर इतर आमदार आणि खासदार सकाळी ९ वाजेच्या सुमारास गुवाहाटीला विमानाने रवाना होतील. (Latest Marathi News)

मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे म्हणाले की, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तेव्हाच निमंत्रण दिलं त्यासाठी आम्ही जातोय. कामाख्या देवीचं दर्शन घ्यायला आम्ही भक्तीभावाने जातोय, त्यात कुणाला काही वेगळं वाटायचं कारण नाही. आमदार उत्साहात आहेत म्हणजे त्यांना दर्शन घ्यायचं आहे.

हे आम्ही राज्यातल्या जनतेसाठीच करतोय. बळीराजाला सुखी करावं, यासाठी कामाख्या देवीच्या दर्शनाला आम्ही जातोय त्यात आमचा वेगळा असा अजेंडा काही नाही. कामाख्या देवीने आमची इच्छा पूर्ण केली आणि राज्यात जनतेचं सरकार आलं, त्यामुळे आता आणखी काही मागण्याची गरज आम्हाला वाटत नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

दरम्यान गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनावेळी विशेष पुजाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी, शिंदे गटातील काही आमदार हे गुवाहाटीला जाणार नसल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत गुवाहाटी दौऱ्यावर काही आमदार आणि मंत्री जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. काही आमदारांनी वैयक्तिक कारणांमुळे तर मंत्री व्यस्त कार्यक्रमांमुळे जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, काही आमदार नाराज असल्याने हा दौरा करत नसल्याची चर्चा आहे. तर काही बदनामीच्या भितीने जात नसून ढोबळ कारणे पुढे करून जात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी गुवाहाटी व्हाया सुरत गाठलं. तिथं जेव्हा त्यांच्या राज्यवापसीची वेळ आली.

कामाख्या देवी ही तांत्रिक- मांत्रिकांसाठी महत्त्वाचे दैवत मानले जाते. कामाख्याची पूजा भगवान शंकराच्या नववधूच्या रूपात केली जाते. कामाख्या देवी मुक्ती देते आणि सर्व इच्छाही पूर्ण करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिर परिसरात भक्ताने कोणतीही इच्छा व्यक्त केली की ती पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणून देवीची देशभरात ख्याती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

SCROLL FOR NEXT