ashok kharat exploitation case Saam tv
मुंबई/पुणे

१०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा कॅप्टन खरातच्या आणखी 'करामती'; एकापेक्षा एक कारनामे उघड

ashok kharat news : १०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा कॅप्टन खरातच्या करामती समोर आल्या आहेत. त्याचे एकापेक्षा एक कारनामे उघड होऊ लागले आहेत.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

१०० हून अधिक महिलांच्या शोषण केल्याचा गंभीर आरोप

खरातकडे ५०० कोटींच्या मालमत्तेची माहिती समोर

अशोक खरातची नाशिक, अहिल्यानगर आणि सिन्नरमध्ये मोठी गुंतवणूक

भोंदूबाबा अशोक खरातचे एक पाठोपाठ एक कारनामे उघड होऊ लागले आहेत. या खरातने १०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा दावा केला जात आहे. उच्चभ्रू आणि सेलिब्रिटींचा सतत गराडा असणार्‍या अशोक खरात ५०० कोटींचा मालक असल्याचे समोर आले आहे. भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या प्रॉपर्टीची यादी समोर आली आहे.

भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाच्या व्हिडिओने महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी भोंदूबाबाला अटक केली आहे. भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातचे बिंग फोडणाऱ्या नीरज जाधव याला देखील अटक केली आहे. शेकडो महिलांचं शोषण करणाऱ्या खरातच्या प्रॉपर्टीची यादी समोर आली आहे.

नाशिकच्या नराधमाचे नाशिक आणि अहिल्यानगर भागातही ३० हून अधिक ठिकाणी प्लॉट्स खरेदी केले आहेत. या सर्व जमिनींची किंमत जवळपास 500 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. अशोक खरातसह त्याची बायको, मुलगी, नातेवाईकांच्या नावावर संपत्ती असल्याचे समोर आलं आहे. या सर्व मालमत्ताची तपासणी होणार का ? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

नाशिकच्या सिन्नर तालुक्यात अशोक खरातची मोठी गुंतवणूक आहे. जमिनींसह सिन्नर शिर्डी रस्त्यावर हार्डवेअरचे मोठं शो रूम आहे. शिवसंकल्प हार्डवेअर दुकान पत्नीच्या नावावर आहे. त्याचे शो रूम मेव्हणा सांभाळतोय. तर कोट्यावधींची बेनामी जमिनींसह बांधकाम व्यवसायात देखील खरातची भागीदारी असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शहापूरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत निलगाय गंभीर जखमी

मुंबईत भीक मागत फिरणारा ‘भावी डॉक्टर’ पोलिसांमुळे पुन्हा कुटुंबाच्या कुशीत

संतापजनक! रात्री रस्त्यावर अर्धनग्न फिरत होता तरूण; फुटपाथवरील भटक्या कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार, सीसीटीव्हीत घटना कैद

Mouth Cancer: सिगारेट न ओढणाऱ्यांमध्येही वाढतोय तोंडाचा कॅन्सर; तरूणांनी या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करूच नये

Rukmini Vasanth Video: प्रसिद्ध अभिनेत्रीचा बिकिनीतील 'तो' व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल; व्हिडिओचं सत्य आलं समोर

SCROLL FOR NEXT