Sharad Pawar And Yugendra Pawar  Saam Tv
मुंबई/पुणे

Baramati Politics: बारामतीत पुन्हा पवार विरूद्ध पवार? 'बारामतीचा दादा बदला', बारामतीच्या कार्यकर्त्यांचं शरद पवारांना साकडं

Sharad Pawar: लोकसभेनंतर विधानसभेतही बारामतीत पवार विरूद्ध पवार सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण पवारांच्या बारामती दौ-यात कार्यकर्त्यांनी बारामतीचा दादा बदलण्याची मागणी केलीय. यावेळी उमेदवाराचं नावंही कार्यकर्त्यांनी सूचवलं.

Vinod Patil

लोकसभा निवडणुकीतला अजित पवारांचा पराभव ताजा असतानाच आता बारामतीतल्या विधानसभेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांमध्ये जोरदार चर्चा सुरू झालीय. विधानसभेतही पवार विरूद्ध पवार सामना रंगण्याची शक्यता आहे.

कारण बारामतीतल्या कार्यकर्त्यांनी दादा बदलण्याचा आग्रह धरलाय. शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पहिलाच बारामतीचा दौरा केला. गोविंद बागेत त्यांना भेटण्यासाठी अनेक कार्यकर्ते आले होते.

यावेळी कार्यकर्त्यांनी पवारांकडे मागणी केली की, ''गाव पुढाऱ्यांपुढे आमचे काही चालत नाही. युग्रेंद्र दादांनी शब्द दिलाय. मी आहे तुम्ही फक्त लढा, म्हणून आम्ही इथे आहोत. युगेंद्रदादांपेक्षा कोणी उमेदवार नाहीये, दादांनाच उमेदावारी मिळावी एवढी इच्छा आहे. युगेंद्रदादांना तुम्ही ताकद द्या. आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत. आमचं दादांकडे लक्ष फक्त तुम्ही लक्ष द्या.''

बारामतीतल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या साहेबांना उमेदवार बदलण्याबाबत आग्रह धरल्यानंतर पवारांनी उमेदवारीबाबत चर्चा न करण्याचा सल्ला उत्साही कार्यकर्त्यांना दिला. शरद पवार म्हणाले आहेत की, ''उमेदवारीबाबत आता चर्चा नको.''

बारामती लोकसभा निवडणुकीत नणंद आणि भावजयमध्ये सामना रंगला होता. मात्र यारूपानं पवार काका-पुतण्यातच ख-या अर्थानं संघर्ष झाला होता. आता बारामतीचा दादा बदलण्याचा नाराच कार्यकर्त्यांनी दिल्यामुळे विधानसभा निवडणुकीतही पुन्हा बारामतीत काका विरूद्ध पुतण्या असाच संघर्ष रंगण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एकनाथ शिंदे नेस्को सेंटरकडे रवाना

Meloni Vs Trump : मेलोनी डोनाल्ड ट्रम्पवर संतापल्या; म्हणाल्या, मी कधीच कुणाकडे भीक मागत नाही!

Father’s Day Gift Ideas: फादर्स डे ला वडिलांच्या चेहऱ्यावर आणा हसू; हे ७ गिफ्ट आयडिया ठरतील बेस्ट

भीषण अपघात! 200 मीटर खोल दरीत वाहन कोसळून आग लागली; 5 जणांचा मृत्यू

Saputara Fort : सापुताऱ्याला ट्रिप प्लान करताय? मग 'हा' ऐतिहासिक किल्ला नक्की पाहा, अनुभवाल निसर्गाचा अद्भुत नजारा

SCROLL FOR NEXT