Shivputra Sambhaji Mahanatya Saam TV
मुंबई/पुणे

Shivputra Sambhaji Mahanatya: शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या फ्री पासेस द्या, अन्यथा... पोलिस कर्मचाऱ्याची थेट आयोजकाला धमकी

Shivputra Sambhaji Mahanatya: महानाट्याची फ्री पासेस मिळावी म्हणून एका पोलिस कर्मचाऱ्याने थेट आयोजकालाच धमकी दिल्याचा आरोप अभिनेता तसेच शिरूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.

गोपाल मोटघरे

Shivputra Sambhaji Mahanatya: पिंपरी-चिंचवड शहरातील एचए ग्राउंडवर शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या महानाट्याची फ्री पासेस मिळावी म्हणून एका पोलिस कर्मचाऱ्याने थेट आयोजकालाच धमकी दिल्याचा आरोप अभिनेता तसेच शिरूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. हा पोलिस कर्मचारी पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील असल्याचं कोल्हे यांनी सांगितलं आहे.  (Latest Marathi News)

अमोल कोल्हे यांची मुख्य भूमिका असलेलं शिवपुत्र संभाजी हा नाटक सध्या पिंपरी चिंचवड शहरातील एच ए ग्राउंड वर आयोजित करण्यात आला आहे. नाटकाला पिंपरी चिंचवडकरांचा भरघोस प्रतिसाद देखील मिळत आहे. मात्र, या महानाट्याच्या फ्री पासेस मिळाव्या म्हणून शहर पोलिस दलातील एका पोलिस (Police) कर्मचाऱ्यांनी चक्क नाटकाच्या आयोजकाला दम दिल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं आहे.

"फ्री पास दिल नाही, तर नाटक कसं होते ते मी पाहतो" असं म्हणत पिंपरी चिंचवड पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यांनी चक्क नाटकाच्या आयोजकाला दम दिल्याचा आरोप खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. नाटकाच्या आयोजकाला दम दिल्याचा आरोप स्वतः अमोल कोल्हे यांनी नाटकाच्या व्यासपीठावरून केला आहे.

त्यासोबतच त्यांनी गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी करावी, अशी मागणी देखील केली आहे. एकीकडे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दिवसाढवळ्या राजकीय कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या होत आहे.

आता पोलीसच किरकोळ मागणीवरून कलाकार आणि आयोजकांना दम देत असल्याचं आरोप खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. शिवपुत्र संभाजी या नाटकाचं उद्घाटनच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Police : भर दिवसा दरोडा टाकला, पुणे पोलिसांनी सिने स्टाईल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

Maharashtra Live News Update: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

IND vs PAK : पाकिस्तानविरोधात खेळावं की नाही, टीम इंडिया संभ्रमात, गौतम गंभीर म्हणाला...

Beed : जामीनावर सुटताच स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी; बीड शहरातील धक्कादायक प्रकार

Dashavatar Collection : बॉक्स ऑफिसवर 'दशावतार'चा बोलबाला; दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयानं केली जादू, २ दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT