Savarkar And Balasaheb Saam TV
मुंबई/पुणे

ढोंगी प्रेम दाखवू नका, सावरकर आणि बाळासाहेबांना भारतरत्न द्या; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Savarkar Controversy News: भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी सावरकरांवर आक्षेपार्ह टीका केली होती. याबाबत शिवसेनेने कोणतीही आक्रमक प्रतिक्रिया दिली नाही यामुळे भाजपने शिवसेनेला धारेवर धरलं आहे.

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

Sanjay Raut Latest News: सावरकर आणि बाळासाहेब यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. राज्यात सावरकर प्रकरणावरून शिवसेनेच्या ठाकरे गट आणि भाजप हे एकमेकांवर टीका-टिपण्णी करत असताना राऊतांनी भाजपवर निशाणा साधताना ही मागणी केली आहे. (Maharashtra Politics News)

शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आज १० वा स्मृतिदिन आहे. बाळासाहेब यांच्या १० स्मृतिदिनी ठाकरे गट आणि शिंदे गटातील अनेक नेत्यांनी मुंबईतील शिवाजी पार्क याठिकाणी त्यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. दोन गटात विभागलेल्या शिवसेनेच्या दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.

अशात भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी सावरकरांवर (Savarkar) आक्षेपार्ह टीका केली होती. याबाबत शिवसेनेने कोणतीही आक्रमक प्रतिक्रिया दिली नाही यावरुन भाजपने शिवसेनेला धारेवर धरलं आहे. शिवसेना आता हिंदुत्ववादी राहिली नसल्याचा आरोप भाजपने केला आहे, तर याबाबत आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत म्हणाले, वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावामागेच त्या पदव्या आपोआप लागलेल्या असतात ते वारंवार सांगायची गरज नाही. वीर सावरकर हे स्वातंत्र्यवीर आणि त्यानंतर एकमेव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रोज आम्हाला सांगायची गरज नाही. कोणाला असे वाटत असेल तर त्यांनी सावरकरांना भारतरत्न द्यावा असं संजय राऊत भाजपला म्हणाले आहेत.

तसेच हिंदुहृदयसम्राट सम्राट आणि वीर सावरकरांना भारतरत्न द्यायला हवा असं म्हणत तो का दिला जात नाही असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे. पुढे ते म्हणाले, हिंदुहृदयसम्राटांविषयी आपल्याला इतकचं प्रेम आहे, तर बाळासाहेब ठाकरे यांना देखील सावरकरांच्या बरोबरीने भारतरत्न मिळाला पाहिजे अशी मागणी राऊतांनी केली आहे.

राऊत म्हणाले, राज्यस्तराच्या अनेक नेत्यांना भारतरत्न देण्यात आला आहे. बाळासाहेबांसारखा महान नेता वीर सावरकरांसारख्या क्रांतिवीरांना भारतरत्न या किताबाने का सन्मानित केले नाही? त्यांना या पदव्या दिल्यामुळे मोठे होणार नाहीत तर या पदव्या मोठ्या होतील. सावरकरांवरती ढोंगी प्रेम दाखवू नका, सावरकरांना भारतरत्न द्या ही मागणी 15 वर्षांपासून करत आहे असं संजय राऊत म्हणालेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साईबाबांच्या समाधी मंदिरात चांदीचा नवा नंदी विराजमान..

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरूच! 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

SCROLL FOR NEXT