Ghatkoper Building Collapse  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Building Collapse : घाटकोपरमध्ये इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या माय-लेकाचा मृत्यू, काल खचली होती इमारत

Mumbai News : विद्याविहार राजेवाडी रुग्णालय परिसरात असलेल्या दोन मजली इमारतीचा मोठा भाग कोसळला होता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे

Mumbai News : मुंबईत कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसादरम्यान घाटकोपरमधील एक दुमजली इमारत कोसळली होती. या इमारतील दोन जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळत होता. कालपासून या दोघांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. मात्र ढिगाऱ्याखाली अडलेल्या दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

 विद्याविहार राजेवाडी रुग्णालय परिसरात असलेल्या दोन मजली इमारतीचा मोठा भाग कोसळला होता. यातील तिसऱ्या मजल्यावरील दोघांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र खचलेली इमारती वरच्या बाजूने जमीनदोस्त करत आत अडकलेल्या दोघांचे बचावकार्य अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकाकडून सुरू होते.

आज पहाटे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. नरेश पालांडे (वय 56 वर्ष) आणि अलका पालांडे (वय 96 वर्ष) अशी दोन्ही मृतांची नावे आहेत. दोघांचेही मृतदेह आता राजावाडी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले आहेत.  (Latest Marathi News)

विलेपार्लेतही इमारत खचून दोघांचा मृत्यू

विलेपार्ले पश्चिमेकडील नानावटी रुग्णालयात शेजारील दोन मजली इमारतही काल कोसळली होती. इमारतीच्या ढिगार्‍यातून पाच जणांना बाहेर काढण्यात आले होते. या पाचही जणांवर मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र यामधील २ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Marathwada Floods : बँकांनीही आवळला शेतकऱ्याभोवती फास; सरकारी बँकांचा, सावकारी कारभार, VIDEO

Cylinder Price: दसऱ्याआधी महागाईचा चटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

SCROLL FOR NEXT