Mumbai Vile Parle News: मोठी दुर्घटना! विलेपार्ले परिसरात इमारत कोसळली; २ जणांचा मृत्यू

Vile Parle Building Collapse News: या पाचही जणांवर मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयात उपचार सुरू होते..
Vile Parle Building Collapse News
Vile Parle Building Collapse NewsSaamtv

संजय गडदे, प्रतिनिधी...

Mumbai Rain Updates News: मुंबईसह महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये कालपासून पावसाने हजेरी लावली. मुंबईत काल पावसाच्या जोरदार सरी बरसलेल्या पाहायला मिळाल्या. ज्यानंतर अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

तसेच अनेक भागात इमारती कोसळ्याच्याही घटना समोर आल्या होत्या. यामध्ये विलेपार्ले पश्चिमेकडील नानावटी रुग्णालयात शेजारील दोन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.. (Mumbai Rain News)

Vile Parle Building Collapse News
Marathi Sahitya Sammelan: मोठी बातमी! ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे आता मुंबईतील धोकादायक असलेल्या इमारती कोसळण्याच्या घटना देखील घडू लागल्या आहेत. मुंबईतील विद्याविहार येथील इमारत कोसळण्याची घटना ताजी असतानाच आता विलेपार्ले (Vile Parle) पश्चिमेकडील नानावटी रुग्णालयात शेजारील दोन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.

आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून इमारतीच्या ढिगार्‍यातून पाच जणांना बाहेर काढण्यात आले होते. या पाचही जणांवर मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र यामधील २ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Vile Parle Building Collapse News
TET Exam Scam: टीईटी परीक्षा घोटाळा; बीड जिल्ह्यातील ७६ उमेदवारांचे टीईट प्रमाणपत्र रद्द

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस उपस्थित असून या ठिकाणी अजून कोणी अडकले आहेत का याचा तपास सुरू आहे. दरम्यान, मुंबईच्या विद्याविहार पूर्वेला असलेल्या चित्तरंजन कॉलनीत एक दुमजली बंगला आठ ते दहा फूट खचल्याची घटना घडली आहे. या बंगल्यात दोनजण अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com