बीड : राज्यभरात गाजलेल्या शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) घोटाळ्यात महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने कारवाई सुरू केली आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील २०१८–१९ मध्ये टीईटी (TET Exam) उत्तीर्ण झालेल्या ७६ उमेदवारांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. तसेच टीईटी प्रमाणपत्र अवैध ठरवल्याचे आदेश राज्य परिक्षा परिषदेने दिले आहेत. या संदर्भात राज्य परिक्षा परिषदेने बीडच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्यांना पत्र पाठवुन कारवाईचे आदेश दिले आहेत. यामुळे बीडच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (Live Marathi News)
बीड जिल्ह्यातील २०१८ मध्ये उत्तीर्ण झालेले १ तर २०१९ मधील ७५ उमेदवार गैरप्रकार करून शिक्षक पात्र परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्या (TET Exam Scam) अनुषंगाने गैरप्रकारात समाविष्ट उमेदवारांविरूध्द शास्ती निश्चित करण्यात येवुन त्यांची संपादणूक रद्द करण्यात आले. त्यांचे टीईटी प्रमाणपत्र अवैध ठरवल्याचे आदेश राज्य परिक्षा परिषदेने दिले आहेत.
याचे प्रमाणपत्र अवैध
टीईटी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये द्रौपदी वैजिनाथ सानप, सविता त्रिंबक घाडगे, सुनिता श्रीराम देवकते, वर्षारानी संभाजी निरडे, मुजाहीद खलील अब्दुल मोमीन, युसूफ शेख युनूस शेख, शाजीया बेगम मो.अब्दुल सत्तार, यास्मीन बेगम सय्यद अब्दुल खादर, उम्मे सायमा वाहजोद्दीन अन्सारी, गणेश जाधव वाकाळे, ज्योती निवृत्तीराव काळे, जीशान हामेद शेख, यास्मीन बेगम जीया अहेमद सिद्दीकी, मोहम्मद खान चाँद खान पठाण,प्रतिक्षा प्रल्हाद वाघ, रमाबाई बालासाहेब जाधव, कौस्तुभ विजयानंद शिंदे, शिल्पा ज्ञानोबा गिते, उजमा फातेमा रफीक बेग मिर्झा, अर्शद रशिद सय्यद, हुमेरा बानु अजहर हुसेन शेख, हुस्ना यास्मीन शेख हमीद शेख, पुजा भास्कर म्हस्के, संतोष किसन आडे, पुजा धोंडिराम कांबळे, परमेश्वर बाबुराव राठोड, सिमा रंगाराव रूद्रे, अजय शामराव जाधव, फरहा यास्मीन जहीरूद्दीन सय्यद, फौजीया नुरूलहसन लाहोरी, आतीया बेगम शेख मुस्तफा शेख, आस्मा सय्यद मो.सिद्दीक सय्यदा, सोबीया फरहा कादरी सय्यद जहीरूद्दीन कादरी, बीबी हाजेरा शेख साजेद, अस्फीया परवीन मो.अब्दुल बासीत, निशाद अर्जुमंद इजहार मजहरोद्दीन सय्यदा, शमीका बन्सीधर राजवान, मीना भिमराव टिके, उर्मिला अवधुराव वाडे, मुक्ताबाई नरहरी सोगे,खान कौसर बेगम शकील खान, सलाम मुक्तार अब्दुल, ईरफान जमील दाईनी सय्यद, मोईनोद्दीन चिस्ती सय्यद समीयोद्दीन सय्यद, अजहर अहमद शकील अहमद शेख, मोहम्मद मुजाहेदोद्दीन मो.मोईजोद्दीन सिद्दीकी, जीया अबरार जफर शेख, नुजहत ताहेरा सय्यद जैकी सय्यद, आकेब अली अमानत अली सय्यद, आदील अय्युब सय्यद, शैलेश कलाबा कसबे, कावेरी दिलीप सानप, आयशा तजीन रफीक शेख, घोबाळे सुहासिनी बालाजी, लोंडल विकास अर्जुन, काळे विश्वास बालासाहेब, उज्मा समीतान खीजर अली कादरी, नराळे सुजप्रिया अरूण, प्रशांत दत्तात्रय कुलकर्णी, अमोल शिवाजी पाटोळे, शहेनाज बेगम नजीर शाह, कौसर नवाजखान पठाण, सविता सुंदरराव पवार, प्रणिता प्रकाशराव कुलकर्णी, निलोफर नाजेमोद्दीन काझी, अदनान अहेमद अनीसखान पठाण, फैजानोद्दीन रीजवानोद्दीन शेख, आलिया बेगम शेख सलीम, फौजीया बेगम शरीफखान पठाण, हिना कौसर जमील शेख, शाहीन बेगम बशिरोद्दीन काझी, मुदस्सीर मेहराज शेख, अन्वरी बेगम मुक्तार अहमद सय्यद, शाजीया तसकीम मो.मुनीसोद्दीन सिद्दीकी, सय्यद फरहीन बेगम रहीमोद्दीन, यांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.