Ghatkopar Hoarding Collapse Case Saam TV
मुंबई/पुणे

Ghatkopar Hoarding Case: घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून ४ जणांचा मृत्यू, ६९ जणांना केलं रेस्क्यू; कंपनीवर गुन्हा, उच्चस्तरीय चौकशी होणार

Priya More

घाटकोपरमध्ये (Ghatkopar) पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू तर ६९ जण जखमी झाले आहे. ४७ जणांना रेस्क्यू करण्यात आले. जखमींवर राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) उपचार सुरू आहेत. अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्या कंपनीविरोधात मुंबई महानगर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. पालिकेने होर्डिंग लावणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावर सध्या मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी फोनवर चर्चा करून होर्डिंग दुर्घटनेची माहीती घेतली.

घाटकोपरच्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत पोलिस ग्राऊंडच्या शेजारी असलेल्या पेट्रोल पंपावर दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक होर्डिंग कोसळले. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हे होर्डिंग कोसळले. हे होर्डिंग अनधिकृत होते. या अनधिकृत होर्डिंगप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई महानगर पालिकेकडून फक्त ४० फूटांचे होर्डिंग लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. तरी देखील हे १२० फूटांचे होर्डिंग लावलेच कसे, असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे. होर्डिंग लावणाऱ्याला यापूर्वीच पालिकेने नोटीस पाठवली होती. घटनास्थळावर बचवकार्यासाठी एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. आतापर्यंत ४७ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. या जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होर्डिंग कोसळल्याच्या प्रकरणाची दखल घेतली आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. याप्रकरणी साम टीव्हीशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. अनधिकृ होर्डिंग लावणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. होर्डिंगचे ऑडिट करण्याच्या सूचना केल्या आहेत. जखमींवर राजावाडीत उपचार सुरू आहेत. लवकरच जखमींना मदत जाहीर करण्यात येईल. सर्व होर्डिंगचे सर्वेक्षण करून लायसन्स नसणाऱ्यांविरोधात कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.'

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत सांगितले की, 'घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ४७ नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई पोलिस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी उपचार करण्यात येत असून त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT