GB Syndrome  Saam Tv
मुंबई/पुणे

GBS Outbreak In Pune: जीबीएसचं संकट काही जाईना! पुण्यात आज ५ नवीन जणांची नोंद, एकूण रुग्णसंख्या १९७ वर

GBS Patients Update: जीबीएसचं संकट कमी होत नाहीये. पुण्यात अजून नवीन रुग्णांची नोंद करण्यात आलीय. यानुसार, एकूण रुग्णांची संख्या १९७ वर पोहोचलीय.

Bharat Jadhav

पुण्यातील जीबीएसचं संकट काही थांबताना दिसत नाहीये. दररोज नवी रुग्णांची नोंद होत आहे. आज दिवसाअखेर ५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून एकूण रुग्णांची संख्या १९७ वर पोहोचलीय. आतापर्यंत १०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर ५० रुग्ण आयसीयूमध्ये असून २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर आतापर्यंत ७ रुग्णांचा मृत्यू झालाय.

यात पुणे मनपा हद्दीतील ४०, नवीन समाविष्ट गावातील ९२,पिंपरी-चिंचवडमधील २९,पुणे ग्रामीण २८, तर इतर जिल्ह्यातील ८ रुग्ण असल्याची माहिती समोर आलीय. गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या गंभीर न्यूरोलॉजिकल रोगाने पुण्यात कहर माजवलाय. सोमवारी या आजाराने त्रस्त असलेल्या पुण्यातील ३७ वर्षीय चालकाचा शहरातील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुण्यात संसर्गाची आणखी आठ प्रकरणे समोर आल्यानंतर संशयित GBS रुग्णांची संख्या १९७ वर पोहोचली आहे.

तर २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, “मृत हे पुण्यात चालक म्हणून काम करत होते. पायात अशक्तपणा आल्याच्या तक्रारीनंतर त्यांना सुरुवातीला शहरातील एका रुग्णालयात आणण्यात आले होतं. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल केले नाही आणि १ फेब्रुवारी रोजी त्यांना कर्नाटकातील निपाणी येथे नेले. यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सांगली येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना जीबीएसच्या उपचारासाठी आयव्हीआयजी इंजेक्शन देण्यात आले.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ५ फेब्रुवारी रोजी रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याला सांगली येथील रुग्णालयातून नेले. त्याच दिवशी पुणे महानगरपालिका संचालित कमला नेहरू रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल केले. ९ फेब्रुवारी रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT