Gutami Patil in Virar: गौतमी पाटील (Gautami Patil) या नावाची वेगळी ओळख करुन द्यायची काही गरज नाही. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात सध्या गौतमीचीचं हवा पाहायला मिळते. आपल्या दिलखेचक अदांनी आणि तडफदार लावणीने गौतमीने तरुणाईला वेड लावले आहे. त्यामुळेच गौतमीच्या कार्यक्रमांना तौबा गर्दी पाहायला मिळते. सांगली नंतर विरारमध्ये गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Breaking Marathi News)
गौतमी पाटील 25 मे रोजी सत्यनारायण पूजेला उपस्थित राहण्यासाठी विरारच्या (Virar) खर्डी गावात प्रभाकर पाटील यांच्या घरी येणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गौतमी पाटीलने (Gautami Patil) एका व्हिडिओद्वारे आपल्या चाहत्यांना आमंत्रण दिले आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
गौतमी पाटीलच्या नृत्याचे वेड पुरुषांइतकेच महिलांमध्येही पाहायला मिळते, अशातच २५ मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची किती गर्दी पाहायला मिळते आणि प्रेक्षक गौतमीच्या नृत्याचा आनंद घेणार का याकडे लक्ष लागले आहे.
सांगलीत लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाला गौतमीचा नाच-गाण्याचा कार्यक्रम
सांगलीच्या (Sangli) तासगाव तालुक्यातील वायफळे गावी एका दाम्पत्याने लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाला गौतमी पाटीलच्या नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. मूळचे वायफळे मधील पण बिहारमध्ये सोने चांदीचा व्यवसायच्या निमित्ताने स्थायिकअसलेल्या विठ्ठल घोडके आणि रुपाली घोडके यांच्या लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता.
दुसरीकडे, गौतमीच्या कार्यक्रमाने अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गौतमी पाटील ही राजकारण, समाजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही. तिच्या कार्यक्रमात अनुचित प्रकार घडत आहेत. त्यामुळे स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून यापूर्वी सांगली जिल्ह्यात गौतमीचा कार्यक्रम होऊ देणार नाही, ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातील तेथील कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, हा कार्यक्रम शांततेत पार पडला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.