Gautami Patil
Gautami Patil  Saam TV
मुंबई/पुणे

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या तालावर शिरूरकर थिरकले; लहान-मोठे सर्वच नृत्य पाहून बेभान

गोपाल मोटघरे

Gautami Patil News : डान्सर गौतमी पाटीलच्या नृत्याची राज्यात सर्वत्र चर्चा आहे. सोशल मीडियावरही गौतमी पाटील हे नाव चर्चेत आहे. आपल्या हटके डान्सच्या शैलीनं गौतमीने महाराष्ट्रातील तरुणांना भुरळ घातली आहे. तरुणाईला प्रेमात पाडणाऱ्या गौतमी पाटीलचा पुण्यातील शिरूर तालुक्यात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गौतमीच्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. (Latest Marathi News)

रिल्सस्टार गौतमी पाटीलचा शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे एका वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी गौतमीच्या आदाकारीला भरभरुन प्रतिसाद देत जल्लोष केला. शिरूरमधील प्रेक्षक बेभान होऊन थिरकले.

तरुणांना नृत्याने प्रेमात पाडणाऱ्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रचंड गर्दी होते. त्यामुळे कार्यक्रमात गोंधळ पाहायाला मिळतो. त्यामुळे गौतमीच्या कार्यक्रमात गोंधळ झाल्याचेही वृत्त आले आहेत.

मात्र, गौतमीच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ घालण्याचे प्रकार होत असताना कवठे येमाई येथील कार्यक्रम विनाविघ्न पार पडला. प्रेक्षकांनीही गौतमीच्या कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद घेतला यावेळी पंचक्रोशीतील तरुणाईने मोठ्या संख्येने गर्दी केली.

कोण आहे गौतमी पाटील?

सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील ही लावणी डान्सर आहे. गौतमी मूळची धुळे जिल्ह्यातील असून तिचा जन्म सिंधखेडा या गावात झाला. गौतमी तिथेच लहानाची मोठी झाली. गौतमीनं आठवीपर्यंत शिक्षण केलं. चोपडा हे तिच्या वडिलांचे गाव आहे.

गौतमीच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, गौतमीचा जन्म झाला तसं तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला सोडले. त्यानंतर आईच्या वडिलांनी गौतमीचे संगोपन केले. आठवी शिक्षण सोडून ती पुण्यात राहायला आली. त्यानंतर तिने नृत्याचं शिक्षण घेतलं. सुरूवातील तिने छोट्या मोठ्या कार्यक्रमाला सहकलाकार म्हणून काम केलं. मात्र, त्यानंतर तिच्या डान्सचे व्हिडिओ व्हायरल होताच तिला मोठी प्रसिद्धी मिळाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal Released : मद्यधोरण घोटाळ्यात अटक, ५१ दिवस तुरुंगात, तिहारमधून सुटका

Sharad Pawar Pune | पुण्यातील शरद पवारांची सभा रद्द

Brij Bhushan Sharan Singh: ब्रिजभूषण शरण सिंह यांना होणार अटक?, दिल्ली कोर्टाने लैंगिक छळ प्रकरणातील आरोप केले निश्चित

Today's Marathi News Live : पहिल्यांदा निर्यातीवर 40% कर लावला, निर्यात बंद केली: जयंत पाटलांचा आरोप

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; कायम जामीन अर्ज मंजूर

SCROLL FOR NEXT