Pune News: 'सबसे कातिल गौतमी पाटील' हे वाक्य आता सगळीकडेच ऐकायला मिळत आहे. आपल्या दिलखेच अदा आणि नृत्याविष्काराच्या माध्यमातून गौतमी पाटीलने (Gautami Patil) अवघ्या महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावलं आहे. सध्या सगळीकडे चर्चा होते ती म्हणजे फक्त गौतमी पाटीलची. सोशल मीडियावर (Social Media) देखील गौतमी पाटील धुमाकूळ घालत असते. सध्या महाराष्ट्रातल्या फक्त शहरांमध्येच नाही तर खेडोपाड्यामध्ये गौतमी पाटीलचे कार्यक्रम होतात. हिच गौतमी पाटील आपल्या तालावर सर्वांना नाचवायची एकही संधी सोडत नाही.
गौतमीची क्रेझ ऐवढी वाढली आहे की अगदी कोणाचे लग्न असो, हदळ असो, वा वाढदिवस असो गौतमीला बोलावलेच जाते. नुकताच गौतमी पाटीलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. आतापर्यंत गौतमीच्या कार्यक्रमाला तरुणांपासून वोयवृद्धांपर्यंत सर्वांनी तुफान गर्दी केल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण गौतमीच्या कार्यक्रमात बैलांनी उपस्थिती लावली असे सांगितल्यावर तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसला असेल ना. तर हे खरं आहे पुण्यामध्ये गौतमी पाटीलचा एक कार्यक्रम झाला याला चक्क बैलांनी हजेरी लावली होती. या बैलांच्यासमोच गौतमीने ठुमके लावले. तिचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
पुणे जिल्ह्यातल्या मुळशीतील एका राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित मांडव टिळा कार्यक्रमात गौतमी पाटीलला बोलवण्यात आले होते. या कार्यक्रमात चक्क बैलासमोर गौतमी पाटील नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमासाठी भलामोठा स्टेज बांधण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या ठिकाणी बावऱ्या नावाचा बैल गौतमीच्या स्टेजच्या समोर बांधला होता. या बैलांच्या समोर गौतमी पाटीलने जबरदस्त नृत्य सादर केले. गौतमी पाटीलचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्यासंख्येने लोकांनी उपस्थिती लावली. मुळशीतील सुशील हगवणे युवा मंच बावऱ्या फॅन्स क्लबने हा कार्यक्रम आयोजित केला होता. सध्या या कार्यक्रमाची चर्चा सगळीकडेच सुरु आहे.
महत्वाचे म्हणजे आता हा बावरा कोण?, त्याला या कार्यक्रमात का आणण्यात आले होते असा प्रश्न सर्वांना पडला असेल. तर बावऱ्या हा शर्यतीचा बैल आहे. या बावऱ्याने अनेक बैलगाडा शर्यती गाजवल्या आहेत. हा गावातला सर्वांचा लाडका बैल आहे. मानाचा बैल म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. गावातील लोकं त्याची सेवा करतात आणि काळजी घेतात. गौतमीची चर्चा तर नेहमीच होत असते. पण तिच्या कार्यक्रमात बावऱ्याने हजेरी लावल्यामुळे आता त्याची देखील चर्चा सगळीकडे होऊ लागली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.