Gautam Adani meets Raj Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Gautam Adani Meets Raj Thackeray: गौतम अदानी यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; नेमकी काय चर्चा झाली?

राज ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या ‘शिवतीर्थ’ येथे ही भेट झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Gautam Adani Meets Raj Thackeray : मागील काही दिवसांत राज्यातील अनेक महत्वाचे प्रकल्प बाहेर गेल्याने आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. विरोधकांनी यावरून सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. आता हे प्रकल्प राज्यात आणण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने प्रयत्न सुरू केले आहे. दरम्यान, अदाणी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी मंगळवारी रात्री मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या ‘शिवतीर्थ’ येथे ही भेट झाली आहे.

या भेटीत दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. गौतम अदानी यांनी अचानक राज ठाकरे यांची भेट घेतल्याने तर्क वितर्क लावले जात आहे. कारण, अदाणी यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी लगेचच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे तसेच भाजपचे नेते आशिष शेलार यांची भेट घेतली होती, त्यानंतर त्यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, धारावी डेव्हलपमेंटचा मुंबईमधील मोठा प्रोजेक्ट अदानी यांच्या कंपनीला मिळाला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी अदाणी हे राज्यातील नेत्यांच्या भेटी घेत आहेत, असे सांगितले जात आहे. पण गौतम अदाणी आणि राज ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस

मोठी बातमी! शिंदे गटाच्या नेत्याला शिवसेनेच्या शाखेतच बांबूने मारहाण; धक्कादायक कारण आलं समोर

ind vs wi odi squad 2026 : भारतीय संघाची घोषणा; रोहित शर्मा, विराट कोहलीबाबत मोठा निर्णय, जडेजाचं कमबॅक

UPI पेमेंटवरील शुल्कावरून राजकारण तापलं, UPI TAX रद्द करण्याची राहुल गांधींची मागणी

Maharashtra News Live Update: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात येणाऱ्या कोणत्याही मंत्र्याला अडवू नका: जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन

SCROLL FOR NEXT