Gatari Amavasya Saam tv
मुंबई/पुणे

Gatari Amavasya: गटारीनिमित्त चिकण, मटणाच्या दरात वाढ; खवय्यांची दुकानात खरेदीसाठी तोबा गर्दी

आजची गटारी अमावस्या साजरी करण्यासाठी पुणेकर खवय्यांनी चिकण-मटणाच्या दुकानात मोठी गर्दी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune News: आज आषाढ महिना संपत आहे. आषाढचा महिना अखेर आणि त्यात रविवारचा दिवस जोडून आल्याने चिकन आणि मटण खवय्यांसाठी आज पर्वणीच आहे. आजची गटारी अमावस्या साजरी करण्यासाठी पुणेकर खवय्यांनी चिकण-मटणाच्या दुकानात मोठी गर्दी केली आहे. आज गटारीनिमित्त चिकण, मटणाच्या दरातही मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

आज गटारी म्हणून सकाळपासूनच पुण्यातील अनेक भागात आखाड साजरा करायला मटण आणि चिकनच्या दुकानात गर्दी पाहायला मिळत आहे. मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर सकाळपासूनच तोबा गर्दी केल्याचे दिसून येत आहे.

यंदाच्या वर्षी अधिक महिना आणि श्रावण एकत्र येत असल्याने आजच्या दिवशी मांसाहाराचा शेवटचा दिवस असल्याने चिकन आणि मटण खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी केली आहे.

आज चिकन दर हे २०० ते २२० रुपये झाले आहे. तर मटण ७०० ते ७५० रुपये किलो रुपये किलो झाले आहे. चिकण आणि मटणाचे दर कितीही असले तरी सकाळी सहा वाजल्यापासूनच दुकानाबाहेर पुणेकरांनी रांगा लावल्याचे चित्र आहे.

काही ठिकाणी तर चक्क नागरिकांना तासभर रांगेत उभं राहावं लागत आहे. पण तरी सुद्धा मटण -चिकन खरेदी करून घरी नेता येतंय त्यामुळे पुणेकरांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.

पुण्यातील प्रसिद्ध बिर्याणी हाऊसवर खवय्यांची गर्दी

आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी 'आखाड पार्टी' करायची हे अनेकांचे दररवर्षीच ठरलेलं गणित. या निमित्ताने पुण्यातील खवव्ये नॉन व्हेजवर तर ताव मरणारच ना?

आखाड पार्टी निमित्ताने आज अनेक जण आपल्या मित्रांसोबत, कुटुंबासोबत एकत्र जेवायला आलेत आणि मटण बिर्याणी, बोंबील फ्राय, चिकन बिर्याणीवर ताव मारतायत. पुण्यातील प्रसिद्ध बिर्याणी हाऊसमध्येही पुणेरी खवय्यांनी मोठी गर्दी केली आहे.

कोल्हापुरातही मटण खरेदीसाठी खवय्यांची तोबा गर्दी

आषाढ अमावस्या आणि आज रविवार असे समीकरण जुळून कोल्हापूरकरांनी फिश मार्केटमध्ये मासे घेण्यासाठी गर्दी केलेली आहे. कोल्हापूरकरांनी सकाळपासूनच आखाड साजरा करायला मासे, मटण, चिकनची दुकाने गाठली आहेत. सकाळी 8 वाजल्यापासूनच दुकानाबाहेर गर्दी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sun Ketu nakshatra transit: 100 वर्षांनी सूर्य केतू एकाच दिवशी करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींना होणार अचानक धनलाभ

Maharashtra Live News Update : 48 तासांसाठी विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Viral Video : मैदानात मुलांसोबत फुटबॉल खेळणारी गाय; व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल

मोठी बातमी! रायगडमध्ये समुद्रात संशयास्पद बोट आढळली, पाकिस्तानची बोट असण्याची शक्यता

Monday Horoscope : सावधान! वेळ आणि पैसा वाया जाणार; 5 राशींच्या लोकांची चिंता वाढवणार

SCROLL FOR NEXT