Gatari Amavasya 2023 : नॉनव्हेज प्रेमींनो, गटारीची तयारी केली का? ताव मारण्यासाठी आता काही तासच शिल्लक

Gatari Festival in Maharashtra : गटारी अमावस्या साजरी करण्यासाठी नॉन व्हेजप्रेमींकडे फक्त साधारणत: 48 तास बाकी आहे.
Gatari Amavasya 2023
Gatari Amavasya 2023Saam tv
Published On

Ashadh Amavasya : श्रावण मास हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा महिना. आषाढ महिन्यातील अमावस्येला साजरी केली जाते. यंदा श्रावण महिना ५९ दिवसांचा आहे. या महिन्यात नॉन व्हेज खाण्यापासून ते मद्यपान व तामासिक पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो.

गटारी अमावस्या ही आषाढ महिन्यातील अमावस्येला साजरी केली जाते. पारंपारिक मराठी महिन्यात, अमावस्या हा शेवटचा दिवस असतो ज्या दिवशी बहुतेक लोक मांसाहारी जेवण करतात आणि मद्याचे सेवन करतात. यावेळी गटारी अमावस्या १८ जुलै २०२३ ला साजरी होणार आहे. गटारी अमावस्येनंतर महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरुवात होते. गटारी अमावस्येला दीप अमावस्या देखील म्हणतात.

Gatari Amavasya 2023
Shravan Shivratri 2023 : तब्बल 30 वर्षानंतर श्रावण शिवरात्रीला 'शुभ वृध्दि योग', शंकराला प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय

महाराष्ट्रात (Maharashtra) श्रावण हा उत्तर भारतानंतर १५ दिवसांनी सुरू होतो. यंदा १८ जुलै २०२३ नंतर गवान शिवाच्या उपासनेचा श्रावण (Shravan) महिना सुरू होणार आहे. भक्त पवित्र श्रावणाच्या विधी आणि प्रथा पाळतात.

1. गटारी अमावस्येचे महत्त्व

हिंदू पंचागानुसार आषाढ अमावस्येनंतर श्रावण मासाला सुरुवात होते. श्रावणाच्या स्वागतासाठी मराठी लोक गटारी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. गटारीच्या दिवशी, लोक रात्रीच्या जेवणाच्या वेळी त्यांच्या जवळच्या मित्रांसह आणि प्रियजनांसह स्वादिष्ट मांसाहारी अन्न आणि मद्यपेयांचा आनंद घेतात.

Gatari Amavasya 2023
Shiv Temple : ठाणे जिल्ह्यातील ९५० वर्षांपूर्वी बांधलेल्या शिवमंदिराचे रहस्य माहिती आहे का?

2. गटारी साजरा करण्यामागचे कारण काय ?

पावसाळा हा ऋतू जितका सुंदर तितकाच तो आजारांना (Disease) आमंत्रण देणारा ऋतू. या महिन्यात अनेक आजार डोकेवर काढतात. कारण हा महिना पावसाळ्यात येतो. त्यामुळे या महिन्यात लोकांना हलके अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. ही गटारी अमावस्या साजरी करण्यासाठी नॉन व्हेजप्रेमींकडे फक्त साधारणत: 48 तास बाकी आहे.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com