Mumbai-Pune News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai-Pune News : गणपती मिरवणुकीला गालबोट; मुंबईत तरुणावर चाकू हल्ला, तर पुण्यात दोन गटात तुफान राडा

Ganpati Visarjan 2023 : मुंबईतील मुलुंडमध्ये गणेश विसर्जनादरम्यान नाचताना धक्का लागल्याच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सूरज सावंत/सचिन जाधव

Mumbai News :

मुंबई, पुण्याच्या गणपती विसर्जनाला गालबोट लागल्याच्या घटना समोर आल्या आहे. मुंबईत नाचताना धक्का लागल्याच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. तर पुण्यातही दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे.

मुंबईतील मुलुंडमध्ये गणेश विसर्जनादरम्यान नाचताना धक्का लागल्याच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला झाला आहे. अमर नगर सर्कल, मच्छी मार्केट, गुरू गोविंद सिंग मार्ग मुलुंड येथील काल रात्री उशिराची ही घटना आहे.

गणेश खंदारे हा २३ वर्षाचा तरुण यामध्ये जखमी झाला असून त्याच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी हल्ला करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

पुण्यात हाणामारीची घटना

पुण्यात सहकारनगर पोलीस स्टेशन जवळ काल २ गटात मारामारी व दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. गणेश विसर्जनदरम्यान हा प्रकार घडला आहे. हा वाद नेमका पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. (Political News)

या घटनेच्या व्हिडीओ आता समोर आला आहे. यामध्ये दिसत आहे की दोन गट एकमेकांना लाठ्या-काठ्या, दगड-विटा मारताना दिसत आहेत. काही महिला हे भांडण सोडवण्याचाही प्रयत्न करतान दिसत आहेत. मात्र या दोन्ही घटनांमुळे मुंबई-पुण्यातील गणपती मिरवणुकींना गालबोट लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: संतापजनक! मुलीने प्रपोज नाकारल्याने हॉटेल मालक संतापला, रिसेप्शनिस्टवर केला बलात्कार

Box Office Collection : 'थामा'च्या कमाईत चौथ्या दिवशी मोठी घसरण; 'एक दीवाने की दीवानियत'नं किती कमावले? वाचा कलेक्शन

हातपाय बांधले अन् गरम चटके; अनैतिक संबंधातून नांदेडच्या तरूणाची कर्नाटकात हत्या

EPFOचा मोठा निर्णय! पेन्शनच्या ५ नियमांत केले बदल; थेट खिशावर होणार परिणाम

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, कारण अस्पष्ट

SCROLL FOR NEXT