Gang War in Pune Saam Tv News
मुंबई/पुणे

क्षुल्लक कारणावरून २ टोळ्यांमध्ये वाद; हाणामारी अन् हवेत गोळीबार, पुण्यात नक्की चाललंय तरी काय?

Gang War in Pune: सिंहगड रोडवरील कोल्हेवाडी चौकात दोन टोळ्यांमध्ये किरकोळ वादातून फायरिंग. गावठी पिस्तुलांतून सलग तीन गोळ्या झाडण्यात आल्या. कोणालाही गोळी लागली नाही, पण काहीजण जखमी.

Bhagyashree Kamble

  • सिंहगड रोडवरील कोल्हेवाडी चौकात दोन टोळ्यांमध्ये किरकोळ वादातून फायरिंग

  • गावठी पिस्तुलांतून सलग तीन गोळ्या झाडण्यात आल्या

  • कोणालाही गोळी लागली नाही, पण काहीजण जखमी

  • पोलिसांचा तपास सुरू असून परिसरात भीतीचे वातावरण

सागर आव्हाड, साम टीव्ही

किरकटवाडी : पुण्यात गुन्हेगारी वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच सिंहगडरोडवर २ टोळ्यांमध्ये किरकोळ वादातून चक्क भरपरिसरात गोळीबाराचा प्रकार घडला आहे. भरचौकात दोन गावठी पिस्तूलांतून सलग तीन राऊंड फायरिंग झाली. यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेने शहराच्या कायदा-सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.

सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी चौकात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार, एका वाहनाला गाडी घासल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. काही क्षणांतच बाचाबाची हाणामारीत परिवर्तित झाली. वाद इतका टोकाला गेला की दोघांनी गावठी कट्टे काढून फायरिंग सुरू केली. गोळ्या संपल्यानंतर आरोपींनी पिस्तूल उलट्या बाजूने मारहाण केली. यामध्ये काही जण जखमी झाले असून सुदैवाने कोणालाही गोळी लागलेली नाही.

या संपूर्ण घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सायंकाळची वर्दळीची वेळ, आजूबाजूला दुकाने, हॉटेल्स, खाजगी क्लासेस आणि बसथांबे असल्याने मोठी दुर्घटना घडली असती, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात.

खडकवासला परिसर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, भररस्त्यात खुलेआम फायरिंग होत असेल तर, पोलीस यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेमागे पूर्ववैमनस्य आहे का, की इतर कोणतेही गुन्हेगारी कारण, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. नांदेड सिटी पोलिसांसह गुन्हे शाखा पथकानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोपींचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchayat Actor Tragedy: ...तेव्हा कुटुंबातील ११ जणांना गमावलं; आपबिती सांगताना अभिनेत्याचे हृदय पिळवटलं

Maharashtra Live News Update : पुणे पोलिस आयुक्तालयात गणेश मंडळांची बैठक सुरू

Raksha Bandhan: यंदाच्या रक्षाबंधनला बहिणीला तिच्या राशीप्रमाणे द्या गिफ्ट; पाहा कोणत्या राशीनुसार काय गिफ्ट द्यावं?

2025 Raksha Bandhan: रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना तीन गाठी बांधा, भावाचे भविष्य होईल उज्वल

Trump Vs India : डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, भारताचे झुकेगा नहीं साला; रशियाकडून तेल खरेदी सुरूच, वाचा नेमकं कारण

SCROLL FOR NEXT