लोणावळ्यात दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पोलिसांच्या जाळ्यात! SaamTvNews
मुंबई/पुणे

लोणावळ्यात दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पोलिसांच्या जाळ्यात!

दिलीप कांबळे

मावळ : लोणावळा (Lonavla) शहरात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला लोणावळा शहर पोलिसांनी सापळा रचून  मोठ्या शिताफीने सापळा रचत आज जेरबंद केले. चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत यापैकी एकजण सराईत गुन्हेगार (Criminal) असून त्याच्यावर बावीस गुन्हे दाखल आहेत. तर इतरांवर चार ते पाच गुन्हे दाखल असून यापैकी दोनजण अल्पवयीन आहेत. चार जणांना जेरबंद करण्यात यश मिळाले असले तरी तर एक जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे.

हे देखील पहा :

सोहेल शेख (वय २०) तर ओमकारसिंग जुनी (वय २१) अशी आरोपींची नावे आहेत. (इतर दोन आरोपी अल्पवयीन आहेत) त्यांच्याकडून दरोड्यासाठी (Robbery) आणण्यात आलेले लोखंडी गोल पाईप, कटावण्या, लाल रंगाची छन्नी, विळा, स्क्रू ड्रायव्हर, वस्तारा, चाकू, ब्लेडच्या पाती, कात्री, वायर कटर, लाल मिरचीची पुड असे साहित्य असलेली बँग ताब्यात घेण्यात आली आहे. आरोपींनी लोणावळा (Lonavla) शहरातील पेट्रोल पंप व काही मोठ्या बंगल्यांची रेकी केली होती.

त्याठिकाणी दरोडा टाकण्याच्या पुर्ण तयारीने ते लोणावळ्यात दाखल झाले होते. मात्र पोलिसांच्या सर्तकेमुळे मोठा गुन्हा टळला आहे. काल खंडाळा भागात रात्रगस्त सुरु असताना पोलीस (Police) काँन्स्टेबल सतिश कुदळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, खंडाळा (Khandala) गावच्या हद्दीत टाटा डक लाईन येथील पडीक डिपी रूम मध्ये काही इसम दरोडा घालण्याच्या तयारीत बसलेले आहेत. या माहितीच्या आधारे लोणावळा शहरचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने खंडाळा गावचे हद्दीतील टाटा डक लाईनचे जवळ असलेल्या पडीक डी.पी रूम समोर सापळा लावत आरोपींना ताब्यात घेतले. अधिक तपास लोणावळा पोलीस करीत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT