Sanjay Shirsat  Saam Tv News
मुंबई/पुणे

MIDC च्या भूखंडावर शिरसाटांचा डल्ला? शिरसाट पुन्हा आरोपांच्या घेऱ्यात; इम्तियाज जलीलांच्या आरोपांनी खळबळ

Sanjay Shirsat : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आणखी एका गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे शिरसाटांच्या अडचणीत वाढ झालीय. मात्र, हा आरोप कुणी केलाय?

Prashant Patil

भरत मोहोळकर, साम टिव्ही

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधातील वादाची मालिका काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही. हॉटेल वेदांतच्या वादातून सावरत नाहीत तोच शेंद्रा एमआयडीसीतील ट्रक टर्मिनन्सची जागाच शिरसाटांनी घशात घातल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय.

काय आहेत आरोप?

शेंद्रा MIDCमध्ये ट्रक टर्मिनससाठी 5 एकर जागा राखीव

3 जून 2022 ला MIDC कडे आरक्षण हटवण्यासाठी प्रस्ताव

24 ऑगस्ट 2023 ला ट्रक टर्मिनन्ससाठीचं आरक्षण हटवलं

आरक्षण हटवून 5 एकर भुखंड 6 कोटी 9 लाखात मुलगा सिद्धांत आणि पत्नीच्या नावावर खरेदी

फूड प्रॉडक्ट्स निर्मितीच्या नावाखाली १०६ कोटींचं भागभांडवल असलेल्या कॅमिया डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या सिद्धांत शिरसाट यांच्या अल्कोहोल बनवणाऱ्या कंपनीला ही जमीन दिल्याचं म्हटलंय. एवढंच नाही तर संजय शिरसाट यांच्या पत्नीचं उत्पन्न २५ लाख असताना त्यांनी जमीन खरेदीसाठी २६ कोटी कुठून आणले? असा सवाल जलील यांनी केलाय. त्यामुळे या आरोपांसंदर्भात आम्ही संजय शिरसाट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र शिरसाटांनी प्रतिक्रीया देण्यास नकार दिलाय. हॉटेल वेदांतच्या कथित खरेदी गैरव्यवहार प्रकरणानंतर आता शेंद्रा एमआयडीसीतील जागेचा वाद समोर आल्यानं मंत्री शिरसाट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी शेतातच तिरंगा फडकावला

मंत्रालयाच्या गेटवर आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलकांना अडवलं; नेमकं काय घडलं?

Actress Accident: 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या कारला भीषण अपघात, बसनं दिली धडक

Kangana Ranaut: 'डेटिंग अ‍ॅप्स 'गटार' आहेत'; कंगना रनौतला नाही आवडत डेटिंग अ‍ॅप्स, कारण सांगत म्हणाली...

MLA Ashish Deshmukh : बाईकवर स्टंट करणं भाजप आमदाराला पडलं महागात, पोलिसांनी केली मोठी कारवाई; VIDEO व्हायरल होताच...

SCROLL FOR NEXT