Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: रिक्षा प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच अटकेत

दोन तासातच पाचही आरोपींना कुरार पोलिसांनी केली अटक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

मुंबई - रात्रीच्या वेळी रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबईच्या (Mumbai) मालाड पूर्वेकडील कुरार पोलिसांना (Police) यश आले आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी रिक्षा चालक असून त्याचे चार साथीदार हे सर्व मालाड (Malad) कुरारगाव परिसरात राहणारे आहेत. या सर्व आरोपींना कुरार पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केली आहे. (Mumbai Crime News)

अटक करण्यात आलेले पाचही आरोपी हे मित्र आहेत. आकाश शिंदे, महेश कांबळे, सनी घोडे, राम राक्षे आणि गणेश राक्षे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 18 सप्टेंबर च्या रात्री मालाड परिसरात दीनबंधू दास आणि कल्याण दुलाई हे दोघे बाहेर हॉटेलमध्ये जेवून रिक्षाची वाट पहात उभे होते. इतक्यात त्या ठिकाणी एक रिक्षा चालक त्यांना कुठे जायचं असे विचारण्यासाठी आला व चला मी तुम्हाला सोडतो असे म्हणत त्यांना रिक्षात बसवले अगोदरच त्या रिक्षात चार जण बसले होते.

मात्र फिर्यादी व रिक्षाचालक हे एकमेकांना ओळखत असल्यामुळे फिर्यादी त्या रिक्षात बसले. काही वेळा नंतर रिक्षा काही अंतर पार करून पुढे गेल्यावर त्या चारही प्रवाशांनी दास आणि दुलाई यांच्या मानेवर सुरा ठेवून दोघांना मारहाण केली व त्यांच्याकडील पाच हजार रुपये देखील लुटले. यानंतर चौघांनी त्या दोघांना रिक्षाच्या बाहेर फेकून दिले.

यानंतर दास व दुलाई यांनी लूटमारीची व मारहाणीची तक्रार कुरार पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून कुरार पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पाचही आरोपींना दोन तासात अटक करून ताब्यात घेतले सध्या पाचही आरोपी कुरार पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World : जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? हनिमूनसाठी सर्वात रोमँटिक ठिकाण

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

SCROLL FOR NEXT