पुणे हादरले: अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार
पुणे हादरले: अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार  Saam tv
मुंबई/पुणे

पुणे हादरले: अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : डोणजे तालुका हवेली येथे १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ५ तरुणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ दिवसापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील २ आरोपींना या गुन्ह्यातही सहभाग आहे.

निलेश नेटके (वय- २१) लक्ष्मण पाटील (वय- २२) आणि इतर ३ अल्पवयीन सर्व राहणार डोणजे (Donje) तालुका हवेली (Haveli) जिल्हा पुणे (Pune) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून यातील निलेश नेटके हा अटक (Arrested) असून लक्ष्मण पाटील फरार झाला आहे. २ दिवसामध्ये २ वेळा बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याने डोणजे परिसरातील पालक आणि शिक्षकांनी (teachers) चिंता व्यक्त केली आहे.

हे देखील पहा-

हवेली पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार आरोपींना १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार करून त्याचे व्हिडिओ (Video) तयार केले होते. घडलेल्या प्रकाराविषयी वाच्यता केल्यास व्हिडिओ व्हायरल (Viral) करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीला आणि तिच्या आईला महिला पोलिस अधिकाऱ्यांनी विश्वासात घेतल्यानंतर पीडित मुलीने याविषयी माहिती दिली आहे.

त्यानुसार हवेली पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील आणि हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

EVM बिघाड, राडा, तुंबळ हाणामारी, व्हिडिओ आणि आरोपांच्या फैरी; तिसऱ्या टप्प्यात कुठं काय घडलं?

IPL 2024 DC vs RR : एकाच षटकात २ विकेट घेत कुलदीपने पालटली बाजू; घरच्या मैदानावर दिल्लीने राजस्थानचा २० धावांनी केला पराभव

Bhayandar News : सोसायटीचं फायर टेंडर दिलं नाही म्हणून अग्निशमनच्या अधिकाऱ्यांने केली बेदम मारहाण, खजिनदार गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT