Pune Ganeshotsav Special Trains Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Ganeshotsav Special Trains : पुण्याहून कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव स्पेशल गाड्या; कुठे थांबणार? तारीख, वेळ जाणून घ्या...

Ganeshotsav Special Trains From Pune to Kokan : पुण्याहून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची सोय केली आहे. या स्पेशल गाड्यांचा तपशील जाणून घ्या...

Yash Shirke

Ganeshotsav 2025 : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक उरले आहेत. आतापासूनच गणेशोत्सवाची तयारी सुरु झाली आहे. कोकणातून अनेकजण मुंबई, पुणे या महानगरांमध्ये कामाच्या निमित्ताने येत असतात. पुण्यात कामासाठी येणाऱ्या नोकरदार वर्गाची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात कोकणातील बरेचसे लोक राहतात. गौरीगणपतीच्या सणाला गावी जाण्यासाठी पुण्यातल्या चाकरमान्यांची लगबग सुरु झाली आहे. या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सव स्पेशल गाड्यांचे नियोजन केले आहे.

१) पुणे ते रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाड्या (६ सेवा)

गाडी क्रमांक 01447 (पुणे ते रत्नागिरी):

शनिवार दिनांक २३ ऑगस्ट, ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे येथून रात्री १२.२५ वाजता (मध्यरात्री) सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११.५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक 01448 (रत्नागिरी ते पुणे):

शनिवार दिनांक २३ ऑगस्ट, ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर २०२५ रोजी रत्नागिरी येथून संध्याकाळी ५.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ५.०० वाजता पोहोचेल.

थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आडवली रोड आणि संगमेश्वर रोड.

डब्यांची रचना:

- 1 वातानुकूलित द्वितीय श्रेणी

- 4 वातानुकूलित तृतीय श्रेणी

- 11 शयनयान डबे

- 4 सामान्य द्वितीय श्रेणी डबे

- 2 गार्ड ब्रेक व्हॅन (द्वितीय आसन व्यवस्था)

२) पुणे ते रत्नागिरी वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाड्या (६ सेवा)

गाडी क्रमांक 01445 (पुणे ते रत्नागिरी – वातानुकूलित):

मंगळवार दिनांक २६ ऑगस्ट, २ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे येथून रात्री १२.२५ वाजता (मध्यरात्री) सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११.५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक 01446 (रत्नागिरी ते पुणे – वातानुकूलित):

मंगळवार दिनांक २६ ऑगस्ट, २ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर २०२५ रोजी रत्नागिरी येथून संध्याकाळी ५.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ५.०० वाजता पोहोचेल.

थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आडवली रोड आणि संगमेश्वर रोड.

डब्यांची रचना:

- 3 वातानुकूलित द्वितीय श्रेणी

- 15 वातानुकूलित तृतीय श्रेणी

- 1 गार्ड ब्रेक व्हॅन (द्वितीय आसन व्यवस्था)

-1 जनरेटर कार

ही दोन्ही गाड्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी लक्षात घेता प्रवाशांनी वेळेपूर्वी आरक्षण करून घ्यावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Free chicken distribution in pune : ओळखपत्र दाखवा अन् चिकन मोफत न्या; जोडप्याने वाटलं 5000 किलो चिकन मोफत, VIDEO

Monday Horoscope : वरिष्ठांच्या नजरेत प्रतिमा उंचावेल, विष्णू उपासना फायदेशीर ठरणार; 'या' राशींच्या लोकांना प्रेमात लाभ होणार

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंची युती कधी होणार? उद्धव ठाकरेंचा युतीबाबत नवा दावा?

Marathi Language Controversy: मुंबईत पुन्हा मराठी-हिंदी वाद उफाळला; परप्रांतीय महिलेचा मराठी बोलण्यास नकार, VIDEO

Couple Romance Viral video : आता याला काय म्हणावं? गर्लफ्रेंडने डोके मांडीवर ठेवले अन्...; उडत्या विमानात कपलचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT