Ganeshotsav Konkan Special Train Saam TV
मुंबई/पुणे

Konkan Special Train: कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज, गणेशोत्सवानिमित्त पुण्यातून ३ विशेष रेल्वेगाड्या

Ganeshotsav Konkan Special Train: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यातून कोकणासाठी तीन विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Ganeshotsav Konkan Special Train: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यातून कोकणासाठी तीन विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे रेल्वे विभागाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, रेल्वेकडून संपूर्ण वेळापत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे.  (Latest Marathi News)

गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील व विशेष करून कोकणातील सर्वात मोठा उत्सव असतो. कोकणातील मोठ्या प्रमाणात नोकरदार चाकरमानी हे मुंबईत राहतात. गणेशोत्सवात चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणाकडे गावी जातात. तर त्यांची प्रवासात पहिली पसंती हे रेल्वेला असते. अशातच गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेवला आहेत.

त्यामुळे कोकणकर आतापासून जाण्यासह परतीच्या प्रवासासाठी रेल्वे तिकीट बुकिंग करताना दिसत आहे. तर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने गणेशोत्सवात गणेश उत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेत आहेत. पुणे रेल्वे प्रशासानाने देखील गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नागरिकांचा ३ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे विभागाकडून १५, २२ आणि २९ सप्टेंबर रोजी या विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. या विशेष रेल्वे गाड्यांना पुणे, लोणावळा, पनवेल, रोहा, मानगाव, खेड, चिपळूण, सावरडा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ रेल्वे स्थानकांवर थांबा आहे. त्यामुळे या गाड्यांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुणे स्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक

पुणे-कुडाळ रेल्वे १५, २२ आणि २९ सप्टेंबर रोजी पुणे स्थानकातून सायंकाळी ६.१५ वाजता सुटेल.

कुडाळ स्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक

कुडाळ-पुणे रेल्वे १७ व २४ सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर रोजी कुडाळ स्थानकातून दुपारी ४.०५ वाजता सुटेल.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dussehra 2025 Date: कधी आहे दसरा? जाणून घ्या रावणाच्या दहनाची तिथी आणि शुभ मुहूर्त

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT