पुण्यामध्ये यंदा गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. गणेश विसर्जनासाठी पुणेकर, पोलिस, पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठकेर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गांवरून मिरवणूक जाणार आहे. मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहर तसेच उपनगरात पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे. महत्वाचे म्हणजे विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्यांसाठी पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिस दल सज्ज झाले आहे. पुण्यामध्ये गणेश विसर्जनादरम्यान संशयितांच्या हालचालींवर सीसीटीव्हींची करडी नजर असणार आहे. विसर्जन मिरवणुकीदिवशी ६ हजारांपेक्षा जास्त पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. महिलांची छेडछाड, सोनसाखळी आणि मोबाईल चोरी रोखण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके तैनात असणार आहेत. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते आणि अंतर्गत रस्ते वाहतुकीस बंदी असणार आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त - ४
पोलीस उपायुक्त - १०
सहायक पोलीस आयुक्त - २५
पोलीस निरीक्षक - १३५
पोलीस कर्मचारी - ५ हजार ७०९
राज्य राखीव पोलीस दल - एक तुकडी
गृहरक्षक दलाचे जवान - ३९४
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीची माहिती आता एका अॅपद्वारे मिळणार आहे. त्यामुळे पुण्यामध्ये गणेशविसर्जनाच्या दिवशी कोणत्या गणपतीची विसर्जन मिरवणूक कुठे आहे याची माहिती मिळणार आहे. गणेश विसर्जनादिवशी ‘माय सेफ पुणे’ अॅपद्वारे बंदोबस्त आणि मंडळांची माहिती प्राप्त होणार आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी जागा, पोलिस मदत केंद्रे, पादचारी मार्ग यांची माहिती उपलब्ध होणार आहे. विसर्जन मिरवणूक मार्ग, बंद रस्ते आणि मंडळांच्या मिरवणुकीबाबत सद्य:स्थितीची माहिती देखील या अॅपद्वारे मिळणार आहे.
पुण्यामध्ये गणपती विसर्जन मिरवणूक पाहायला येणाऱ्यांसाठी पार्किंगची खास व्यवस्था करण्यात आली आहे. पुण्यात १३ ठिकाणी मोटारी आणि दुचाकी लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन सोहळ्यानिमित्त १३ ठिकाणी वाहने लावण्याची व्यवस्था पोलिसांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी येणाऱ्यांनी पार्किंगचे टेन्शन घेण्याची काहिच गरज नाही.
- शिवाजी आखाडा वाहनतळ, मंगळवार पेठ
- एसएसपीएमएस मैदान,
- स. प. महाविद्यालय, टिळक रस्ता
- पेशवे उद्यान, सारसबाग
- पाटील प्लाझा, मित्रमंडळ
- दांडेकर पूल ते गणेश मळा
- नीलायम चित्रपटगृह
- संजीवनी वैद्यकीय महाविद्यालय मैदान
- कर्वे रस्ता
- फर्ग्युसन महाविद्यालय मैदान
- जैन हॉस्टेल मैदान
- बीएमसीसी रस्ता
- मराठवाडा महाविद्यालय
- नदीपात्र ते भिडे पूल
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.