सुमित सावंत
मुंबई : राज्य सरकारकडून यंदाच्या वर्षी गणेशोत्सव, दहीहंडी आणी मोहरम सारख्या सणांवर कोरोना निर्बंध लादण्यात येणार नाही. त्यामुळे यंदा दहीहंडी, गणेशोत्सव (Dahi Handi) धुमधडाक्यात साजरा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतल्यानंतर सदर निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशान्वये मुंबई महापालिकेने (BMC) गणेशोत्सवासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. (Ganesh Festival News )
गणेशोत्सवाकरिता मुंबई महानगर पालिकेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना खालील प्रमाणे
1) गणेश मंडळांच्या मंडपांच्या परवानगीसाठी रु. 100/- शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येत आहे. तसेच यापूर्वी गणेशोत्सव 2022 साठीच्या मंडपांच्या परवानगीकरीता मंडळांनी शुल्क भरून परवानगी प्राप्त केली असेल तर अशा मंडळांना रु.100/- चा परतावा लवकरच करण्यात येईल..
2) गणेशोत्सव 2022 करिता मूर्तिकारांच्या मंडपांकरिताचे शुल्क प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्याकडून पूर्णपणे माफ करण्यात येईल तसेच ज्यांनी याअगोदर शुल्क भरले असेल तर त्यांना सदर शुल्काचा परतावा करण्यात येईल.
3) गणेशोत्सव 2022 करिता अनुज्ञापन खात्यामार्फत आकारण्यात येणारे जाहिरात शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येईल. तसेच ज्यांनी या अगोदर शुल्क भरले असेल तर त्यांना सदर शुल्काचा परतावा करण्यात येईल,
4) महापलिकेच्या मंडप उभारणी बाबत उद्यान खाते व मालमत्ता खाते व खाजगी भूखंडावर आकारण्यात येणारे शुल्कदेखील माफ करण्यात येईल.
5) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीसाठी कमाल उंचीचे कोणतेही निर्बंध 2022 व्या गणेशोत्सवाकरिता असणार नाहीत.
6) घरगुती गणेश मूर्तीसाठी या अगोदर 2 फुट उंचीची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली होती. तरी आता घरगुती गणेश मूर्तीसाठी उधीची कोणतीही मर्यादा असणार नाही. परंतु घरगुती मूर्तीच्या उच्चीवर स्वखुशीने 2 फुट उंचीची मर्यादा पाळण्याबाबत आवाहन करण्यात येईल.
7) नैसर्गिक विसर्जन स्थळी तसेच कृत्रिम विसर्जन स्थळी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यात येईल.
8) आगमन व विसर्जन रस्त्यांवर संबंधित विज पुरवठादार यांच्यामार्फत विजेच्या व्यवस्थतेबाबत संबंधित विभागीय सहा. आयुक्त यांच्यास्तरावर चर्चा करून आवश्यक ती सुधारणा (दिवाबत्तीची संख्या व क्षमता) करण्यात येईल.
9) मंडप शुल्क माफ करण्यात आले असले तरीसुध्दा विविध परिपत्रकांमध्ये असलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे आवश्यक आहे. (उदा. अग्निशमन दलाचे कोडीफाईड शर्ती, अनुज्ञापन खात्याचे अटी व शर्ती इ.)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.