Ganpati Special Train 2025 Saam Tv
मुंबई/पुणे

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Ganpati Special Train update : गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. मध्य रेल्वेने कोकणकरांसाठी महत्वाची घोषणा केली आहे.

Saam Tv

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेनी मोठी घोषणा केली आहे. मध्य रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त विशेष गाड्यांचं नियोजन केलं आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या एकूण गणपती विशेष गाड्यांची संख्या आता ३०२ झाली आहे

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त गणपती विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने आधी २९६ गणपती विशेष ट्रेनव्यतिरिक्त या ६ ट्रेन चालवण्यात येणार आहे. यामुळे गणपती विशेष ट्रेनची एकूण संख्या आता ३०२ झाली आहे.

६ गणपती विशेष गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे

लोकमान्य टिळक टर्मिनस– मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष ट्रेन (एकूण ६ सेवा)

साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोमवारपासून २५.०८.२०२५, ०१.०९.२०२५ आणि ०८.०९.२०२५ रोजी ०८.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २२.४० वाजता मडगाव येथे पोहोचेल.

साप्ताहिक विशेष गाडी मडगाव येथून रविवार दि. २४.०८.२०२५, ३१.०८.२०२५ आणि ०७.०९.२०२५ रोजी १६.३० वाजता सुटेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ०६.०० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी.

संरचना: १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी, २ इकोनॉमी वातानुकूलित तृतीय श्रेणी, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसन व्यवस्था असलेला गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.

आरक्षण : गणपती विशेष गाड्यांसाठी 5 ऑगस्टपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होईल. अनारक्षित डब्यांचे बुकिंग यूटीएस प्रणालीद्वारे करता येईल. तसेच सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कानुसार आकारले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

SCROLL FOR NEXT