Badlapur Ganesh Idol  Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur Ganesh Idol : बदलापूरचे गणपती बाप्पा कॅनडाला रवाना; परदेशातही साजरा होणार पर्यावरणपूरक गणेशोत्सव

Ganesh Idol : यंदा ४५ ते ५० हजार बाप्पा परदेशी रवाना होणार

अजय दुधाणे

Badlapur News : बदलापूर शहरातून गणपती बाप्पा थेट कॅनडाला रवाना झाले आहेत. परदेशातल्या भारतीयांना गणेशोत्सव साजरा करता यावा, यासाठी बदलापूरच्या चिंतामणी क्रिएशन्सच्या माध्यमातून दरवर्षी हजारो पर्यावरणपूरक गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या जातात. (Maharashtra News)

गणेशोत्सवाला अद्याप ६ महिने बाकी असले, तरी मूर्तिकार मात्र आत्तापासूनच तयारीला लागलेत. त्यातही परदेशात असलेल्या भारतीयांनाही बाप्पाचा पाहुणचार करता यावा, यासाठी बदलापूरचे (Badlapur) तरुण उद्योजक निमेश जनवाड यांच्या चिंतामणी क्रिएशन्सकडून दरवर्षी हजारो गणपती बाप्पा परदेशात पाठवले जातात.

बाप्पांचा हा प्रवास लांबचा असल्यानं अगदी ६ महिने आधीपासूनच गणपती बाप्पांच्या परदेशवारीला सुरुवात होते. यंदा सर्वात आधी कॅनडा देशात गणपती बाप्पा (Ganesh Idol) रवाना झाले आहेत. पहिल्या खेपेत कॅनडाच्या व्हॅनकुव्हर शहरात अडीच हजार बाप्पा रवाना झाले आहेत.

जुलै महिन्याखेरपर्यंत बाप्पांची ही परदेशवारी अखंडपणे सुरू असते, ज्यात हजारो गणपती बाप्पा आपल्या परदेशातल्या भक्तांकडे रवाना होत असतात. दरवर्षी कॅनडासह अमेरिका, इंग्लंड, युरोप, आखाती देश, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया अशा जगातल्या अनेक देशांमध्ये निमेश जनवाड हे गणेशमूर्ती पाठवत असतात. त्यामुळे परदेशात वास्तव्याला असलेले भारतीय तिकडे राहून आपल्या लाडक्या बाप्पाचा पाहुणचार करू शकतात.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

SCROLL FOR NEXT