11th Admission Saam Tv
मुंबई/पुणे

11th Admission: अकरावीच्या प्रवेशाची पहिली यादी ३० जूनला, नवीन वेळापत्रक पाहा

11th Admission First Merit List: अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी ३० जूनला लागणार आहे.

Siddhi Hande

अकरावीच्या (11th Admission) विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता अकरावीच्या प्रवेशाच्या पहिली यादी ३० जूनला लागणार आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी पालकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पहिली यादी काल जाहीर होणार होती. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे ही यादी जाहीर झाली नाही.

अकरावीची पहिली प्रवेश प्रक्रिया यादी 30 जूनला (11th Admission First Merit List)

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीची निवड यादी तांत्रिक अडचणीमुळे गुरुवारी ही जाहीर झाली नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेचे आणखी एक सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार पहिल्या फेरीची निवड यादी 30 जूनला जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

यंदा प्रथमच अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने प्रथमच राज्य पातळीवर राबविण्यात येत आहे. प्रवेशासाठीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार राज्यातील 9 हजार 435 कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 21 लाख 23 हजार 720 जागा उपलब्ध आहेत. यामधील कोट्यातून 6 हजार 487 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार काल यादी जाहीर होणार होती,मात्र तांत्रिक अडचणीमुळे निवड यादी जाहीर झाली नाही.

अकरावीच्या पहिल्या यादीत जर विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये पहिल्या नंबरचे अॅडमिशन मिळाले तर त्यांना ते घ्यावे लागणार आहे. जर त्यांना ते कॉलेज हवे नसेल तर पुढच्या मेरिट लिस्टसाठी ते दुसऱ्या कॉलेजसाठी नावे देऊ शकतात. अकरावीच्या प्रवेशासाठी ३ मेरिट लिस्ट जाहीर होतात. त्यानंतर एक विशेष मेरिट लिस्ट जाहीर केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jaigad Fort History: भव्य वास्तुकला आणि कोकण किनाऱ्याचे अद्भुत दृश्य, जयगड किल्ल्याचे वैशिष्ट्ये आणि इतिहास

मुलींना मासिक पाळी येण्याचं योग्य वय कोणतं?

Fruits Importance: देवाला पाच फळे का अर्पण करतात?

Sara Tendulkar: सचिनची लेक सारा तेंडुलकर पुन्हा चर्चेत; फोटोतील तो मराठी मुलगा कोण?

Maratha Reservation: सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद, मराठा आरक्षणावरून भुजबळ नाराज, विखे पाटील म्हणाले आम्ही कोणाचे आरक्षण काढून घेत नाही|VIDEO

SCROLL FOR NEXT