Maharashtra Politics: कोल्हापूरात काँग्रेसला खिंडार, माजी उपमहापौरांसह २३ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Politics: कोल्हापूरमध्ये काँग्रेस, भाजप आणि ताराराणी आघाडीला खिंडार पडलं. माजी उपमहापौरांसह २३ माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे कोल्हापूरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिंदे गटाची ताकद वाढली.
Kolhapur: कोल्हापूरात काँग्रेसला खिंडार, माजी उपमहापौरांसह २३ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
Deputy CM Eknath ShindeSaam Tv
Published On

रणजित माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापुरातील माजी उपमहापौरांसह २३ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रात्री मुंबईत त्यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतलं. मुंबईतील मुक्ताई बंगल्यावर रात्री आठच्या सुमारास हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे निकटवर्तीय समजल्या जाणारे शारंगधर देशमुख यांच्यासह महत्त्वाचे माजी नगरसेवक शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे कोल्हापूरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

कोल्हापूरातील माजी महापौरांसह २३ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेस, भाजप, ताराराणी आघाडीला खिंडार पडलं आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसपेक्षा भाजप ताराराणी आघाडीतून जास्त आउटगोइंग सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राजकीय गोटात जोरदार हालचाली सुरू आहे. या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूरमध्ये आता शिंदे गटाची ताकद चांगलीच वाढली आहे.

Kolhapur: कोल्हापूरात काँग्रेसला खिंडार, माजी उपमहापौरांसह २३ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
Kolhapur Politics: कोल्हापुरात एकनाथ शिंदेंचा काँग्रेस-भाजप आणि ताराराणी आघाडीला धक्का; २ माजी महापौरांसह २० नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राजकीय गोटात हालचालींना वेग आलेला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतीसह २३ माजी नगरसेवकांनी मंगळवारी मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये गेल्या सभागृहातील १४ नगरसेवकांचा समावेश आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान शिंदे गटामध्ये प्रवेश केलेल्या सर्वांनी यावेळी महापालिकेवर भगवा फडकण्याचा निर्धार केला.

Kolhapur: कोल्हापूरात काँग्रेसला खिंडार, माजी उपमहापौरांसह २३ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
Maharashtra Politics : अजित पवारांच्या खात्यावर 'वॉच' ठेवा, त्यांच्याकडे 'इतक्या' कोटींचे दोन निधी; एकनाथ शिंदेंचे मंत्र्यांना आदेश

दरम्यान, पालकमंत्री प्रकाश अबीटकर, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार जयश्री जाधव यांच्या उपस्थितीत माजी महापौरांसह २३ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकाच्या गळ्यात शिवसेनेचा स्कार्प घालून त्यांचे स्वागत केलं. या पक्ष प्रवेशामुळे कोल्हापूरमध्ये काँग्रेसची ताकद कमी होऊन शिंदे गटाची ताकद वाढली आहे.

Kolhapur: कोल्हापूरात काँग्रेसला खिंडार, माजी उपमहापौरांसह २३ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
Maharashtra Politics: 'मिले सूर मेरा तुम्हारा', नाराज भास्कर जाधवांकडून शिंदे गटाच्या आमदाराचं कौतुक, ठाकरेंच्या शिलेदाराच्या मनात नेमकं चाललंय काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com