Nana Patole, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: दोघात तिसरा! ठाकरे गट-भाजप लढतीत काँग्रेस ठरणार लाभार्थी, कल्याण पूर्व विधानसभेवर ठोकला दावा?

Kalyan Politics: कल्याण पूर्वेत काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे याचे भावी आमदार म्हणून बॅनर झळकलेत. महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून हालचाली सुरू झाल्यात.

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण प्रतिनिधी

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गट भाजपमध्ये सुरू असलेल्या शीत युद्धाचा फायदा घेत काँग्रेसने या मतदारसंघात तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून हालचाली सुरू झाल्यात.

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाचा दावा असणार आहे. त्याचवेळी आता काँग्रेसने देखील दावा केल्याने या मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण पूर्वेत भावी आमदार अशा आशयाचे बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या तयारीला सर्वच पक्ष लागलेले आहेत. यात महाविकास आघाडी मधील काँग्रेसला चांगलं यश आल्याने विधानसभा निवडणुकांसाठी अनेक मतदारसंघात काँग्रेसमधून इच्छुक आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधून उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे.

यातच महायुतीच्या अंतर्गत वादातील विधानसभा म्हणजे कल्याण पूर्व विधानसभेत भाजप आमदार गणपत गायकवाड शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याने तुरुंगात आहे. मात्र यानंतर कल्याण पूर्व येथील शिवसेना व भाजप यांचा अंतर्गत वादाचा फायदा यावेळेस नक्कीच कल्याण पूर्व येथील महाविकास आघाडीला होणार असून कल्याण पूर्व विधानसभेसाठी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी आमदारकी लढवणार असल्याचे सांगितले होते.

Sachin Pote

यानंतर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण पूर्वेत कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देणारे मोठ्या प्रमाणात बॅनर लागले असून या बॅनरवर सचिन पोटे भावी आमदार, असा उल्लेख करत बॅनरबाजी करण्यात आली आहे. यामुळे काँग्रेस कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु केली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून देखील कल्याण पूर्व मतदारसंघावर दावा करण्यात आलाय. त्यामुळे या जागेवरून महाविकास आघाडीसमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rinku Rajguru: नास्तिकतेपासून अध्यात्माकडे...; 'हा' अनुभव रिंकू राजगुरूसाठी ठरला टर्निंग पॉईंट

Maharashtra Live News Update: बीडमध्ये दहावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ

Haldi Yellow Saree Designs: हळदीला पिवळ्या रंगाची साडी का नेसतात? माहितीये का?

Vastu Tips : घरात धातूचा कासव ठेवल्याने होतील 'हे' जबरदस्त फायदे, जाणून घ्या कासव ठेवण्याची योग्य पध्दत

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त, प्रति तोळा इतकी झाली किंमत, वाचा 22k, 22k गोल्डचे ताजे दर

SCROLL FOR NEXT