VIDEO: बॅटरी प्लांटमध्ये भीषण आग, 21 जणांचा होरपळून मृत्यू; दक्षिण कोरियातील दुर्घटना

South Korea Battery Factory Fire: दक्षिण कोरियातील बॅटरी प्लांटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली असून यामध्ये 21 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
VIDEO: बॅटरी प्लांटमध्ये भीषण आग, 21 जणांचा होरपळून मृत्यू; दक्षिण कोरियातील दुर्घटना
South Korea Battery Factory FireSaam Tv

दक्षिण कोरियातील लिथियम बॅटरी प्लांटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून त्यापैकी 18 चिनी नागरिक आहेत.

अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत अनेकजण होरपळल्याने त्यांची ओळख पटवण्यास वेळ लागू शकतो. अग्निशमन विभागाने सांगितलं की, राजधानी सोलच्या दक्षिणेला ह्वासेओंग येथील बॅटरी उत्पादक एरिसेलच्या प्लांटमध्ये सकाळी 10:30 च्या सुमारास ही आग लागली.

VIDEO: बॅटरी प्लांटमध्ये भीषण आग, 21 जणांचा होरपळून मृत्यू; दक्षिण कोरियातील दुर्घटना
CM Shinde Video : भंडाऱ्यात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखविले काळे झेंडे

अग्निशमन विभागाने माहिती देताना सांगितलं की, 35,000 युनिट्स असलेल्या प्लांटमध्ये बॅटरी सेल युनिटच्या स्फोटामुळे ही आग लागली. मात्र हा स्फोट कशामुळे झाला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागली तेव्हा कंपनीत 67 लोक काम करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ही आग इतकी भीषण होती की, संपूर्ण प्लांट जळून खाक झाला. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. आता आगीत मृत्यू झालेली आणि होरपळलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे.

VIDEO: बॅटरी प्लांटमध्ये भीषण आग, 21 जणांचा होरपळून मृत्यू; दक्षिण कोरियातील दुर्घटना
Pune Drugs Case : तर्राट! डीजेचा दणदणाट, बेधुंद तरुणाई; पुण्यातील एल ३ हॉटेलच्या पार्टीचे आणखी दोन VIDEO

दरम्याम, ज्या प्लांटमध्ये आग लागली त्या एरिसेल कंपनीची स्थापना 2020 मध्ये झाली होती. कंपनी सेन्सर आणि रेडिओ कम्युनिकेशन उपकरणांसाठी लिथियम बॅटरी बनवते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com