Dombivli News Saam tv
मुंबई/पुणे

Dombivli News : प्लास्टिकच्या पिशवीत लघवी करुन फळ विक्री; डोबिंवलीत विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार, VIDEO

Vishal Gangurde

कल्याण : काही वर्षांपूर्वी एका पाणीपुरी विक्रेत्याने पाणीपुरीच्या पाण्यात आपली लघवी मिसळली होती. हीच पाणीपुरी विक्रेता विकत होता. या विक्रेत्याचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आसाममधील असणाऱ्या या पाणीपुरी विक्रेत्याच्या प्रकार पाहून अनेक जण शॉक झाले होते. त्यानंतर असाच एक किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. एका फळ विक्रेत्याने प्लास्टिकच्या पिशवीत लघवी केली, त्यानंतर त्याच हाताने फळ विक्री केल्याचा किळसवाणा प्रकार केला आहे. या फळ विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

डोंबिवलीतील एका फळ विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. डोंबिवलीच्या निळजे परिसरातील एका फळ विक्रेत्याने प्लास्टिकच्या पिशवीत लघवी करून त्याच हाताने फळे ग्राहकांना दिले. या फळ विक्रेत्याचा लघवी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फळ विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार समोर आल्यानंतर मानमाडा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

नेमकं काय घडलं?

एक फळ विक्रेता प्लास्टिकच्या पिशवीत लघवी करत त्याच हाताने फळे ग्राहकांना देतानाचा व्हिडियो व्हायरल झालाय. डोंबिवली निळजे परिसरातील एका फळ विक्रेत्याचा हा व्हिडिओ होता. या व्हिडिओनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे. या व्हायरल व्हिडिओची दखल मानपाडा पोलिसांनी घेतली आहे.

या व्हायरल व्हिडिओनंतर मानपाडा पोलिसांनी तत्काळ फळविक्रेता अली खान याला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या फळविक्रेत्या अली खानची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या किळसवाण्या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

पाणीपुरीवाल्याचा किळवाणा प्रकार

आसामच्या गुवाहाटीमधील एक पाणीपुरी विक्रेता आपली लघवी पाणीपुरी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात मिसळताना दिसला. या विक्रेत्याचा लघवी पाण्यात ओतताना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला होता. या प्रकारानंतर पोलिसांनी या विक्रेत्याला बेड्या ठाकून त्याच्यावर कारवाई केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : 15 दिवसांत आचारसंहिता लागेल, कार्यकर्त्यांनो कामाला लागा; अजित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, VIDEO

Maharashtra News Live Updates : आरटीओ कर्मचारी २४ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार

Satara : इंद्रधनुष्याची चादर अन् डोंगर रांगा, साताऱ्यातील गाव पाहून होईल स्वर्गाची अनुभूती

Tirupati Laddu Controversy: 'नायडू हे खोटे बोलणारे, राजकारणासाठी श्रद्धेशी खेळतायत', लाडूच्या वादावर जगन यांचं पंतप्रधानांना पत्र

Beetroot Juice: सकाळी बिटरुट ज्यूस पिण्याचे जबरद्स्त फायदे...

SCROLL FOR NEXT