Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी नियमित फळे खाण्याचा वैद्यकीय सल्ला दिला जातो.
नियमितपणे फळे खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
फळे ही शरीरातील पोषणतत्वाची कमतरता भरून काढते.
फळांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने शरीरातील पचनक्रिया सुरळीत होते.
तिखट तसेच तेलकट खाल्ल्याने बद्धकोष्ठता,मुळव्याध यांसारख्या समस्या उद्भवतात अशावेळी फळांचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.
वजन कमी करण्यासाठी नियमितपणे फळांचे सेवन करा.
फळांमधील पोषणतत्वांमुळे त्वचा आणि केसाचं सौंदर्य कायम राहते
फळांमधील अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे किडनी, लिवर आणि आतड्यांच्या समस्या दूर होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.