Sanjay Raut Saam TV
मुंबई/पुणे

ठेकेदार पद्धतीने गुलाम नेमले जातात सैन्य नव्हे; अग्निपथ योजनेवरुन संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

'जगभरात ज्याच्या मनात हिंदुत्व आहे तो बाळासाहेबांना बापचं मानतो आणि बाप एकच असतो.'

Jagdish Patil

मुंबई : ठेकेदार पद्धतीने गुलाम नेमले जातात देशाचं सैन्य नाही, कंत्राटी पद्धतीने सैन्याची भरती होणार असून देशाचं रक्षण कोणी करायचं हे कळत नाही त्यांच्या हातात देश असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली. शिवसनेच्या ५६ व्या वर्धापन दिना निमित्त आज मुंबईतील वेस्ट इन हॉलमध्ये बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित आमदारांना मार्गदर्शन करताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नेहमीप्रमाणे आपल्या आक्रमक शैलीत भाजपवर हल्लाबोल केला.

बाळासाहेब ठाकरे यांनी एक ठिणगी मुंबईत टाकली त्या ठिणगीचा ५६ वर्षात देशभरात वणवा पेटला त्याचाच आज वर्धापण दिन असल्याचं राऊत म्हणाले. शिवाय मगाशी उद्धव ठाकरे व्यासपीठावर आले तेंव्हा त्यांनी शिवाजी महाराज आणि बाळासाहेब यांना पुष्पहार अर्पण केलं त्यावेळी आदित्य यांनी आज 'फादर्स-डे' आहे असं सांगितलं.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे आपले बाप आहेत. देशाला बाप नाही, असं बाळासाहेब म्हणायचे. मात्र, आज मी सांगू इच्छितो की, हिंदुत्वाचा बाप हा बाळासाहेब ठाकरे आहेत. जगातले प्रत्येकजन ज्यांच्या मनात हिंदुत्व आहे, तो बाळासाहेबांना बापचं मानतो आणि बाप एकच असतो असंही ते यावेळी म्हणाले.

हे देखील पाहा -

अयोध्येत आमचं जे स्वागत केलं साधू संतानी जे आशीर्वाद दिले. ते आपल्या हिंदुत्वाला दिले. सेनेच हिंदुत्व काय आहे कोण आहे कोणत्या दिशेला चाललंय याचं मार्गदर्शन कोणाकडून घ्यायची गरज नाही. आज तुफानाचा वाढदिवस आहे अब तक ५६ विरोधकांना अजून खूप काही पहायचं आहे.

काही लोकांना घमेंड आली आहे. एक जागा जिंकली म्हणजे जग जिंकलं नाही या राज्याची सुत्र उद्धव ठाकरेंकडेच आणि शिवसेनेकडेच असतील फार घमेंड करुन नका, तुम्हारा घमंड तो चार दिन का है पगले हमारी बादशाही तो खानदानी है! असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. बादशाहीला नख लावण्याची हिम्मत अजून कोणात पैदा झाली नसल्याचंही राऊत म्हणाले.

अग्निवीर योजना म्हणजे (Agnivir) सैन्यामध्ये कंत्राटी पद्धतीने चार वर्षासाठी सैन्य भरणे. जगाच्या पाठीवर असा मुर्ख निर्णय कोणत्याही राज्यकर्त्याने घेतलेला नाही. मात्र, देशात आज कंत्राटी पद्धतीने सैन्याची भरती होणार आहे. देशाचं रक्षण कोणी करायच कळत नाही त्यांच्या हातात देश आहे. शिवाय ठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात देशाचं सैन्य नाही. असं म्हणत राऊत यांनी केंद्रावर टीका केली. शिवाय देश धूसमसतोय मात्र, महाराष्ट्र शांत आहे कारण, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत म्हणून असही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने पुन्हा घेतला मोठा निर्णय

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

SCROLL FOR NEXT