Mahayuti Government Saam
मुंबई/पुणे

Pune GBS News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! मेंदू व्हायरसच्या रूग्णांवर होणार मोफत उपचार, अजित पवारांनी दिली माहिती

Pune Guillain Barre Syndrome News : पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची वाढ होत आहे. कमला नेहरू पार्कमध्ये रुग्णांना मोफत उपचार मिळत आहे, आर्थिक ताण मिळू नये म्हणून प्रशासनाला सूचना देण्यात आल्या, असे अजित पवार म्हणाले.

Namdeo Kumbhar

Guillain Barre Syndrome News : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमची (Guillain Barre Syndrome) रुग्णसंख्या वाढत आहे. रविवारी पुण्यात एका रूग्णाचा मृत्यू झाला, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुलेन बॅरी सिंड्रोमबाबत प्रशासन सतर्क झालेय, उपाययोजना करण्यात येत आहे.

जीबीएस आजारावर उपचारासाठी मोठा खर्च लागतो. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पुण्यात या रूग्णांची संख्या वाढत आहे. पुणेकरांनी या आजारावर मोफत उपचार केले जावेत, अशी मागणी केली होती. ही मागणी प्रशासनाकडून मान्य करण्यात आली आहे. अजित पवार यांनी याबाबत आज घोषणा केली. आता पुण्यात जीबीएस आजारावर मोफत उपचार होणार आहेत.

GBS आजरावर पुणे महानगर पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. पुण्यात GBS चे सध्या 74 रुग्ण आहेत. त्यापैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर. तर पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. प्रशासनाकडून जीबीएस आजारासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये, काळजी घ्यावी असं आवाहन आज अजित पवारांनी केलं आहे.

कमला नेहरू रूग्णालयात आता जीबीएसवर मोफत उपचार केले जाणार आहेत. या रूग्णालयात 50 बेड आणि 15आय सी यू आरक्षित करण्यात आले आहेत. पुणे महापालिका आयुक्त सर्व आरोग्य विभागाची थोड्याच वेळात बैठक घेणार आहेत.

ज्या खासगी रुग्णालयात GBS चे रुग्ण आहेत. त्या ठिकाणी महापालिकेचे मेडिकल ऑफिसर नियुक्त करण्यात येणार आहेत. नवले हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दीनानाथ रुग्णालय या ठिकाणी खासगी दवाखाने रुग्णांची बिल किती घेतात यावर लक्ष ठेवले जाणार आहे. पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेडगाव, किरकटवाडी परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. त्या ठिकाणी महापालिका शुद्ध पाण्याचा पुरवठा करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT