PMPML Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : पुणे व पिंपरी चिंचवड पोलिसांना PMPML चा दणका, फ्री प्रवास आजपासून बंद

पीएमपीने पत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवडमधील पोलिसांना पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) झटका दिला आहे. आजपासून (15 नोव्हेंबर) पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास करता येणार नाही. पीएमपीने पत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे.

पुण्यात वाहतूक कोंडीवरून लेटर वॉर झालं होतं त्यानंतर पोलीस आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त यांच्या लेटर वॉरमध्ये पीएमपीने पत्र काढून बीआरटी काढू नये असं सांगितले होते. मात्र आता पीएमपीएमएलकडून पोलिसांना मिळणारा मोफत प्रवास बंद करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पोलिसांना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसमधून 1991 पासून मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. (Latest Marathi News)

एमपीएमएल नवा रेकॉर्ड

पुण्यातील सार्वजनिक वाहतूक असलेल्या पीएमपीएमएल बसने नवा रेकॉर्ड केला आहे. काल पीएमपीएमएल बसने एकाच दिवसात दोन कोटी रुपये कमावले आहेत. पीएमपीएमएल बसमधून एकाच दिवसात १३ लाख पुणेकरांनी प्रवास केला.

पीएमपीएमएलच्या १६५७ बसेस रस्त्यांवर धावल्या आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी प्रदूषण होत असल्याने पुणेकरांचा कल पीएमपीएमएल बसकडे वाढताना दिसत आहे. शहरात एसी बस, सीएनजी आणि मिनी बसेस रस्त्यांवर धावत आहेत. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पीएमपीएमएल प्रशासनाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मजूर, कामगार, महिला, नोकरदार, ज्येष्ठ नागरिकांसोबतच विद्यार्थ्यांचीही पीएमपी बस प्रवासात लक्षणीय वाढ झाली आहे. .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उमेदवाराची रास कोणती? कशी असेल निवडणूक, भाग्य उजळणार की आणखी काही...वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update : कल्याणमध्ये प्रचाराच्या सांगते वेळी दुर्दैवी घटना; रॅलीत झेंडा विजेच्या तारेस लागून स्फोट

Wednesday Horoscope: मकरसंक्रातीला या ४ राशींचं नशीब फळफळणार, कामात बढतीचेही योग; वाचा बुधवारचे राशीभविष्य

KDMC मध्ये २१ उमेदवार बिनविरोध, सत्ताही आमचीच येणार; मंत्री पंकजा मुंडेंनी सांगितलं गणित

saunf jeera water: दिवसाची सुरुवात बडीशेप आणि जीरा पाणी पिऊन करण्याचे काय फायदे आहेत?

SCROLL FOR NEXT