Fraud  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime: परदेशातील नोकरीचं आमिष दाखवून लाखोंचा गंडा, पुण्यातील व्यक्तीची फसवणूक

पोलिसांनी ब्रोकस्टन विल्यम्स, ऑस्टिन इक्र, रिचर्ड अशा तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : चांगली नोकरी मिळावी ही प्रत्येकाची इच्छा असते. उच्च शिक्षित तरुणांना परदेशात नोकरी करण्याची इच्छा जास्त असते. मात्र अनेकदा तरुण नोकरीसाठी एंजटची मदत घेतात आणि यात फसवणुकीची शक्यता देखील असते. असाच फसवणुकीचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.

न्यूझीलंडमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत पुण्यात उच्चशिक्षित व्यक्तीची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मल्टी नॅशनल कंपनीमध्ये वरिष्ठ पद मिळवून देतो, असे सांगत ५८ वर्षीय व्यक्तीची तब्बल ७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी ५८ वर्षीय व्यक्तीने पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी ब्रोकस्टन विल्यम्स, ऑस्टिन इक्र, रिचर्ड अशा तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र ही नावं ईमेल आयडीवर वापरली असल्यामुळे या नावांची पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही. (Maharashtra News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार मार्च २०२२ ते एप्रिल २०२२ मध्ये घडला. ब्रोकस्टन विल्यम्स, ऑस्टिन इक्र आणि रिचर्ड यांनी फिर्यादीला बेयर कॉर्पसायन्स व मिनिस्ट्री ऑफ बिझिनेस, इंनोवेशन अँड एम्प्लॉयमेंट, न्यूझीलंड या कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवले.

या कंपनीमध्ये वरिष्ठ पदासाठी नोकरी लावून देतो, असे त्यांना ईमेल केले. इतकंच नाही तर कंपनीचे बनावट कागदपत्र, लेटर, व्हिजा देखील ईमेल केले. या तिघांनी फिर्यादीला इमिग्रेशनसाठी पैसे लागतील असे सांगत बँक खात्याचा नंबर देऊन त्यात ७ लाख रुपये पाठवायला सांगितले.

विश्वास संपादन झाल्यानंतर तसेच वरिष्ठ पदावर नोकरी मिळेल या अमिषाला बळी पडून फिर्यादीने पैसे ट्रान्स्फर केले. मात्र त्यानंतर कुठलाच संपर्क होऊ न शकल्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: खरा गद्दार कोण? कैलास गोरंट्याल याच्या भाजप प्रवेशावर आमदार अर्जुन खोतकरांचा घणाघात|VIDEO

Marathi Language Controversy : हिंदीत बोला, मराठी समजत नाही; प्रवाशाच्या तक्रारीवर रेल्वे अधिकाऱ्याचं अजब उत्तर, कुठे घडला प्रकार?

Maharashtra Live News Update: हरणांच्या मृत्यूप्रकरणी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

gold Bacteria: सोनं देणारा बॅक्टेरिया? बॅक्टेरियाच्या विष्ठेतून शुद्ध सोनं?|Fact Check

Crime : सोशल मीडियावर ओळख, अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल; शाळकरी मुलीवर हॉटेलमध्ये बलात्कार

SCROLL FOR NEXT